शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: Shocking! 'या' १० बड्या खेळाडूंना कुणीच घेतलं नाही संघात, अखेर राहिले UNSOLD !!
2
IPL Auction 2025: जोस बटलर, मिचेल स्टार्क ते ट्रेंट बोल्ट... हे ठरले TOP 10 महागडे परदेशी खेळाडू
3
IPL Auction 2025: दोन दिवसांत १८२ खेळाडूंवर लागली बोली, 'हे' ठरले TOP 10 महागडे क्रिकेटपटू
4
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
5
IPL Auction 2025: IPL मेगालिलाव 'सुफळ संपूर्ण'! १८२ खेळाडूंना मिळाले ६३९ कोटी, दोन दिवसांत काय घडलं?
6
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
7
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, ₹792 वरून थेट ₹1 वर आला शेअर; ₹1 लाखाचे झाले 227 रुपये
8
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
9
'वर पाहिजे...'; एकुलता एक, 20 एकरचे फॉर्महाऊस, न पादणारा अन्...; लग्नासाठीची जाहिरात जबरदस्त चर्चेत!
10
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
11
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
12
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
13
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
14
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
15
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
16
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
17
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
18
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
19
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
20
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी

लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2018 12:41 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  लोकसभा निवडणुकांची घोषणा येत्या काळात कधीही होऊ शकते. ही बाब लक्षात घेता निवडणूक आयोगाने ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  लोकसभा निवडणुकांची घोषणा येत्या काळात कधीही होऊ शकते. ही बाब लक्षात घेता निवडणूक आयोगाने सर्व जिल्हा प्रशासन आणि निवडणूक विभागाला आवश्यक त्या तयारीच्या सुचना दिल्या आहेत. त्यानुसार नंदुरबारात शनिवारी जिल्हास्तरीय बैठक घेण्यात आली. त्यात मतदान यंत्र, मतदान केंद्र, मणुष्यबळ, वाहने यांची उपलब्धता आणि इतर बाबींचा आढावा घेण्यात आला. दरम्यान, गेल्याच आठवडय़ात उपलब्ध सर्व मतदान यंत्र, व्हीव्हीपॅट उपकरण यांची चाचपणी पुर्ण करून ते सील करण्यात आले.लोकसभा निवडणुका मार्च, एप्रिल मध्ये होण्याची शक्यता आहे. त्या आधीही निवडणुका होण्याची शक्यता गृहीत धरली जात आहे. त्यामुळे निवडणुकीची पुर्वतयारी सर्व जिल्हा प्रशासनांनी करून घेण्याच्या सुचना सर्व जिल्हा प्रशासनांना वरिष्ठ पातळीवरून देण्यात आल्या आहेत.  गेल्या महिनाभरापासून येथे उपलब्ध असलेले मतदान यंत्र, कंट्रोल युनिट व यंदापासून वापरण्यात येणारे व्हीव्हीपॅट उपकरण यांची चाचपणी घेण्यात आली. उपलब्ध सर्वच जवळपास तीन हजार यंत्र मागील डाटा काढून, आवश्यक त्या दुरूस्ती करून सील करण्यात आले आहेत. शनिवारी जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी यांनी सर्व संबधित यंत्रणांची, विभाग प्रमुखांची याच पाश्र्वभुमीवर बैठक घेतली. सर्वाकडून तयारीचा आढावा घेण्यात आला. यावेळी पोलीस अधीक्षक संजय पाटील, सहायक जिल्हाधिकारी वान्मती सी., निवासी उपजिल्हाधिकारी अनिल पाटील, निवडणूक उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी एन.डी.बच्छाव, पोलीस उपअधीक्षक सिताराम गायकवाड, पुंडलीक सपकाळे आदी उपस्थित होते.  जिल्हाधिका:यांनी सांगितले, प्रत्येक मतदान केंद्रावर रॅम्प असणे आवश्यक आहे. मतदान केंद्राच्या इमारती, दुर्गम भागातील रस्ते यांची आवश्यक ती दुरूस्ती करून घ्यावी निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अवैध धंदे रोखावे व बंद करावे. संवेदनशील, अतिसंवेदनशील  केंद्रांची निश्चिती करावी. फ्लॉईंग स्कॉड तयार करावे. पोलीस डिप्लॉयमेंट प्लॅन तयार करावा. मतदान, मतमोजणीच्या वेळी लागणारा कर्मचारी, पोलीस बंदोबस्ताचे नियोजन करावे. वाहनांची आवश्यक तेव्हढी व्यवस्था करावी आदी सुचना दिल्या.उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुधीर खांदे यांनी सांगितले, लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या पाश्र्वभुमीवर विविध कक्षांची स्थापना करण्यात आली आहे. यात मणुष्यबळ व्यवस्थापन, संगणक कक्ष, ईव्हीएम/व्हीव्हीपॅट समन्वय कक्ष, वाहतूक व्यवस्थापन कक्ष, माध्यम नियंत्रण व प्रमाणिकरण कक्ष स्थापन करण्यात आले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. वविध विभागाकडून काही सुचना व त्या अनुषंगाने यावेळी जिल्हाधिका:यांनी आढावा देखील घेतला.लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्याला विविध यंत्रणा उपलब्ध झाली आहे. 2,879 बॅलेट युनिट, 1, 674 कंट्रोल व तेवढेच व्हीव्हीपॅट मशीन.मतदान केंद्राध्यक्ष 1,380, राखीव 414 एकुण 1,794.मतदान अधिकारी 5,520, राखीव 1,656, एकुण 7,176शिपाई 1,380, राखीव 414, एकुण 1,794.एकुण मणुष्यबळ 8,280, राखीव 2,484, एकुण 10,764.आवश्यक वाहने 394, राखीव 79, एकुण  472.मतदान केंद्रांची एकुण संख्या 2068.विधानसभा निहाय मतदान केंद्र : अक्कलकुवा 349, शहादा 335, नंदुरबार 360, नवापूर 336, साक्री 365, शिरपूर 323.