शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
2
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
3
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
4
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
5
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
6
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई, सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ५ जण ठार
7
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण
8
पर्थ टेस्टसाठी शास्त्रींनी निवडली बेस्ट संभाव्य प्लेइंग इलेव्हन; सर्फराजपेक्षा KL राहुल भारी?
9
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
10
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्तव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!
11
भामरागडमध्ये पर्लकोटा नदीजवळ स्फोट, पोलिसांकडून सर्च ऑपरेशन
12
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
13
'अबीर गुलाल'नंतर नुकतीच सुरु झालेली कलर्स मराठीवरील नवी मालिका होणार बंद? चाहत्यांना धक्का
14
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
15
Meta चा Video, लोकेशनसह अलर्ट; पोलिसांनी १२ मिनिटांत ९ किमी जाऊन वाचवला तरुणाचा जीव
16
Sunita Williams : सुनीता विल्यम्सच्या अडचणी वाढल्या, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात तडे, अनेक ठिकाणाहून गळती
17
जेफरीजनं 'या' ५ Stock वर सुरू केलं कव्हरेज, दिला खरेदीचा सल्ला; HAL, PNB सारख्या दिग्गजांचा समावेश
18
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
19
Astrology: शनिदोष टाळण्यासाठी सगळ्याच राशीच्या लोकांनी आवर्जून 'अशी' घ्या काळजी!
20
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?

डिजिटल प्रशासनात जिल्हा राज्यात तिसरा

By admin | Published: January 17, 2017 11:55 PM

नंदुरबार जिल्ह्याने शासनाच्या ई-ऑफिस या डिजिटल संकल्पनेत बाजी मारत, तिस:या क्रमाकांचे ई-प्रशासन राबवले आह़े

नंदुरबार : राज्यात आदिवासी जिल्हा म्हणून परिचित असलेल्या नंदुरबार जिल्ह्याने शासनाच्या ई-ऑफिस या डिजिटल संकल्पनेत बाजी मारत, तिस:या क्रमाकांचे ई-प्रशासन राबवले आह़े यामुळे कामकाज सोपे होऊन प्रत्येक कागदाची नोंद ही शासनदरबारी झाली आह़े राज्यात केवळ इतर दोन जिल्ह्यात ई-ऑफिस ही प्रणाली कार्यरत आह़े सातपुडय़ाच्या दुर्गम भागासह दोन राज्यांच्या सिमेवर असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात संपर्क आणि दळणवळण यंत्रणेचा अभाव असा गवगवा सातत्याने गेल्या काही वर्षात झाला होता़ मात्र गेल्या वर्षात या स्थितीत बदल झाला असून डिजिटल इंडिया या संकल्पनेला बळ देण्याचे काम जिल्हा प्रशासन करत आह़े प्रशासनाने गेल्या महिन्यात मुख्यमंत्री यांच्या हस्ते नव्या अॅपचे उद्घाटन केले आह़े अॅप तयार करणारा पाचवा जिल्हा अशी ओळख राज्यात होत आह़े या अॅपला डाऊनलोड करून युझर्सनी पसंतीची पावती दिली आह़े समस्या तत्काळ निघतात निकालीमंत्रालयीन स्तरावर 100 टक्के ई- ऑफिस ही संकल्पना राज्य शासनाने 2014 पासून राबवण्यास सुरूवात केली होती़ राज्यभरात येणा:या नागरिकांच्या तक्रारी, निविदा, अजर्, तक्रार अजर्, निवेदन, प्रस्ताव, ग्रामपंचायतींचे ठराव यासह इतर बरेच लिखित स्वरूपात येणा:या कागदांना स्कॅन करून त्याच्या नावासह संगणकात सेव्ह करून तो कागद संबंधितांच्या डेस्कवर पोहोचवण्याचा हा अभिनव प्रयत्न होता़ तो 100 टक्के यशस्वी ठरल्यानंतर विविध जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये ही संकल्पना राबवण्यात आली आली आह़े 4राज्यात प्रारंभी सिंधुदुर्ग व जालना या दोन जिल्ह्यात ई-ऑफिस संकल्पना राबवण्यात आली़ या दोन्ही ठिकाणी यश आल्यानंतर नंदुरबार जिल्ह्यात गेल्या वर्षभरापासून ही संकल्पना राबवण्यात येत आह़े याठिकाणीही पूर्ण यश आले असून, प्रत्येक विभागात देण्यात आलेल्या प्रत्येक कागद आणि त्यावरील मजकूराची नेमकी काय, स्थिती आह़े हे नागरिकांना घरबसल्या पाहणे शक्य झाले आह़े संबंधित विभाग प्रमुख फाईल नेमकी कोणाकडे आहे पाहून, त्यावर निर्णय देऊन समस्या निकाली काढत आहेत़ मोबाईल अॅपला मिळतेय पसंतीएकीकडे ई-ऑफिसमध्ये तिसरा क्रमांक मिळवणा:या जिल्हा प्रशासनाने स्वत:चे ‘अपग्रेड’ झालेले मोबाईल अॅप विकसित केले आह़े एनआयसीने केवळ 15 दिवसात विकतित केलेल्या ‘नंदुरबार मोबाईल’ अॅपला पसंती मिळत असल्याचे पहिल्याच दिवशी दिसून आले होत़े अद्यापर्पयत जिल्ह्यातील अडीच हजार नागरिकांनी हे अॅप डाऊनलोड केल्याची माहिती समोर आली आह़े  नंदुरबार शहरातील शाळा, महाविद्यालय, हॉटेल्स, रस्ते, प्रशासकीय कार्यालये, बसस्थानक, रेल्वे यांची इत्थंभूत माहिती या अॅपमध्ये देण्यात आली आह़े यामुळे बाहेरगावाहून येणा:या पर्यटकांची सोय झाली आह़े यासोबतच औषध विक्रेते, खाजगी आणि सरकारी दवाखाने, सातबारा उतारा आणि मतदार याद्यांची माहिती याठिकाणी देण्यात आली आह़े आपत्कालीन स्थितीत मदत मिळवण्यासाठी हे अॅप सर्वात उपयोगी ठरत असल्याचे मोबाईल युझर्सचे म्हणणे आह़े राज्यात आतार्पयत हिंगोली, नांदेड, जालना नंतर नंदुरबार जिल्ह्याचे अधिकृत मोबाईल अॅप विकसित करण्यात आले आह़े