रांगेत उभे राहून नोंदले जिल्हाधिका:यांनी प्रतिज्ञापत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 11:25 AM
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा प्रशासनाचे प्रमुख असलेल्या जिल्हाधिका:यांना आपल्या कार्यालयात बसून आपल्या स्वत:चे विविध कागदपत्रे तयार करता येतील. त्यासाठी संपुर्ण यंत्रणा कामाला लावता येईल, परंतु येथील जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी यांनी स्वत: सेतू केंद्रात जावून प्रतिज्ञापत्र नोंदवून घेतल्याचे चित्र सोमवारी तहसील कार्यालयात दिसून आले. जिल्हाधिकारी हे स्वत: जिल्हा प्रशासनाचे प्रमुख ...
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा प्रशासनाचे प्रमुख असलेल्या जिल्हाधिका:यांना आपल्या कार्यालयात बसून आपल्या स्वत:चे विविध कागदपत्रे तयार करता येतील. त्यासाठी संपुर्ण यंत्रणा कामाला लावता येईल, परंतु येथील जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी यांनी स्वत: सेतू केंद्रात जावून प्रतिज्ञापत्र नोंदवून घेतल्याचे चित्र सोमवारी तहसील कार्यालयात दिसून आले.जिल्हाधिकारी हे स्वत: जिल्हा प्रशासनाचे प्रमुख अधिकारी. संपुर्ण यंत्रणा त्यांच्या आदेशान्वये हालते. त्यांना स्वत:चे काही कागदपत्रे हवे असल्यास एका शब्दाने व क्षणात त्यांचे काम होऊ शकते. परंतु जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी यांनी या सर्व बाबींना नेहमीच फाटा दिला आहे. सोमवारी डॉ.कलशेट्टी यांना स्वत:चे प्रतिज्ञापत्र करावयाचे होते. त्यासाठी ते स्वत: तहसील कार्यालयात आले. जिल्हाधिका:यांचे वाहन येताच तहसीलदार नितीन पाटील व इतर अधिकारी तेथे आले. परंतु जिल्हाधिकारी तहसीलदारांच्या दालनात न जाता सरळ सेतू केंद्रात गेले. तेथे असलेल्या कर्मचा:याला त्यांनी प्रतिज्ञापत्र करावयाचे असल्याचे सांगितले. कर्मचारी उठून कामाला लागले. परंतु त्यांनी काम नियमित सुरू ठेवण्याच्या सुचना दिल्या. त्यानंतर खिडकी समोर रांगेत उभे राहून त्यांनी प्रतिज्ञापत्रावरील फोटो काढून घेतला. आवश्यक प्रक्रिया पुर्ण केल्यानंतर ते सामान्य नागरिकाप्रमाणे तेथून निघाले. त्यानंतर अधिका:यांना काही सुचना देत ते तेथून निघाले.यानिमित्ताने सेतूचे एकूण कामकाज आणि त्यासंदर्भातील पहाणी देखील या निमित्ताने जिल्हाधिका:यांनी केली.