भाकपाचे प्रकाशा येथे जिल्हा अधिवेशन, नऊ ठराव मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 12:03 PM
लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा अधिवेशन येथे झाले. भाकपाचे राज्य सहसेक्रेटरी तुकाराम भस्मे यांच्या हस्ते पक्षाच्या लाल ङोंडय़ाचे ध्वजारोहण करण्यात आले. अधिवेशनाचे उद्घाटन हिरालाल परदेशी यांनी केले. या अधिवेशनात नऊ ठराव पारीत करण्यात आले. या अधिवेशनात 30 प्रमुख कार्यकत्र्याची ...
लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा अधिवेशन येथे झाले. भाकपाचे राज्य सहसेक्रेटरी तुकाराम भस्मे यांच्या हस्ते पक्षाच्या लाल ङोंडय़ाचे ध्वजारोहण करण्यात आले. अधिवेशनाचे उद्घाटन हिरालाल परदेशी यांनी केले. या अधिवेशनात नऊ ठराव पारीत करण्यात आले. या अधिवेशनात 30 प्रमुख कार्यकत्र्याची जिल्हा कमिटीत करण्यात आली.अधिवेशनस्थळाला कॉ.सैनाबाई पवार असे नाव देण्यात आले होते. या वेळी पक्षाच्या त्रैवार्षिक कामाचा अहवाल माणिक सूर्यवंशी यांनी मांडला. अहवालावर उपस्थितीत प्रतिनिधींनी चर्चा केल्यानंतर अहवाल पारीत करण्यात आला. भाकपाचे राज्य सहसेक्रेटरी तुकाराम भस्मे म्हणाले की, केंद्र व राज्य शासनाने महाराष्ट्राच्या जनतेचा भ्रमनिरास केला. विदर्भासह महाराष्ट्रातील शेतकरी-शेतमजुरांकडे या शासनाने अजिबात लक्ष दिले नाही असे सांगून येत्या मार्चमध्ये होणारे भाकपाचे राज्य अधिवेशन यशस्वी करण्याचे आवाहन त्यांनी केले.जीवन पाटील यांनी कठीण काळात आपले अधिवेशन होत असून डाव्यांची एकजूट रहावी यासाठी माकपा व भाकपाने पुढाकार घेतला पाहिजे. मोहन शेवाळे यांनी जिल्ह्यातील मजुरांचे स्थलांतर शासनाने थांबवून स्थानिक ठिकाणी रोजगार उपलब्ध केला पाहिजे. पेसा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी भाकपा आदिवासी महासभेतर्फे आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.सूत्रसंचालन ईश्वर पाटील यांनी केले. या वेळी द्वारकाबाई गांगुर्डे, मधुकर पाडवी, डॉ.सतीश वळवी, मुलकनबाई, अजरुन कोळी, दिलीप ईशी, राजेंद्र गिरासे, दिलीप पाडवी, गोपाळ कांबळे, रोहिदास महाराज, बेबीबाई न्हावी, संगीता सूर्यवंशी, दिवाण मोरे, सीताराम माळी, धर्मा पवार, डॉ.शहा, दंगल सोनवणे, बुधा पवार, गुलाब माळी, नजाबाई पवार, देविसिंग वळवी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. अधिवेशनासाठी भाकपाच्या तालुका कौन्सिल व प्रकाश युनिटचे पदाधिकारी व कार्यकत्र्यानी परिश्रम घेतले.