लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरीट फाटय़ानजीक खोदलेल्या खड्डयात पडलेल्या दोघांना जिल्हाधिकारी व शिक्षकाने मदतीचा हात देत बाहेर काढले. दोघांना किरकोळ दुखापत झाली. परंतु अंधारामुळे मदतीसाठी जिवाच्या आकांताने ओरडणा:या दोघांना वेळीच मदतीचा हात मिळाल्याने समाधान व्यक्त होत आहे. सध्या कोळदा ते खेतिया दरम्यान रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. त्याअंतर्गत कोरीटनाकाजवळ फरशी पुलाजवळ मोठा खड्डा खोदण्यात आला आहे. रात्रीच्या अंधारात एका मोटरसायकलस्वाराला तेथील रस्त्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे मोटरसायकलस्वारासह त्याच्यामागे बसलेला असे दोन्हीजण थेट त्या खड्डयात पडले. अंधार असल्यामुळे ते पडल्याचे कुणाचाही लक्षात आले नाही. मदतीसाठी ते रस्त्याने येणा:या-जाणा:या वाहनांना आवाज देत होते. परंतु कुणाचेही लक्ष जात नव्हते. परंतु उमेश पाटील या शिक्षकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी त्यांची दुचाकी थांबवून दोन्ही युवकांना मदतीचा हात देण्याचा प्रय} केला. त्याचवेळी जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी हे शहादाकडून नंदुरबारकडे येत असतांना त्यांनीही आपले वाहन थांबवले. डॉ.कलशेट्टी यांच्यासह त्यांचे चालक महारू पाटील, उमेश पाटील यांनी दोघा युवकांना बाहेर काढले. दोघांना किरकोळ खरचटले होते. समशेरपूर येथील दोन्ही युवक असल्याचे त्यांनी सांगितले. प्रसंगावधानामुळे रात्रीच्या अंधारात दोघांना वेळीच मदत मिळून त्यांचा जीव वाचल्यामुळे दोन्ही युवकांनी समाधान व्यक्त केले.
अपघातग्रस्तांना जिल्हाधिका:यांनी दिला मदतीचा हात : नंदुरबारातील कोरीटनजीकची घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2018 12:10 PM