लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन संघटनेचा जिल्हा मेळावा शहरात आयोजित करण्यात आला होता़ यावेळी संघटनेच्या विविध मागण्यांवर चर्चा करण्यात आली़ मेळाव्या अध्यक्षस्थानी प्रा़ राजेंद्र शिंदे होत़ेप्रसंगी संघटनेचे राज्याध्यक्ष प्रा़डॉ़ संजय शिंदे, प्रा़एस़एऩ पाटील, प्रा़ गणेश सोनवणे , प्रा़ आय़डी़पाटील, प्रा. डी़एऩवाघ, प्रा विलास डामरे , प्रा़बबन बागुल , प्रा. हिम्मत चव्हाण, प्रा़ निशिकांत शिंपी, प्रा़आऱसी़माळी, प्रा़वळवी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होत़ेमेळाव्यात डीसीपीएस, वाढीव पद (प्रस्तावित) विनाअनुदानित कर्मचारी, माहिती तंत्रज्ञान प्राध्यापकांनी राज्याध्यक्ष शिंदे यांना निवेदन देऊन विविध मागण्यांवर चर्चा केली़ मेळाव्यात बोलताना डॉ़ शिंदे यांनी सांगितले की, नवीन लागलेल्या कर्मचा:यांच्या मागण्यांवर काम सुरु आह़़े 20 टक्के अनुदान, माहिती तंत्रज्ञान विषय, वाढीव पद या मागण्या पुर्णत्वाला नेल्या आहेत़ माहिती तत्रंज्ञान विषय शिक्षकांची यंदाची दिवाळी चांगली होणार आह़े जिल्ह्यातील विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयात काम करणा:या शिक्षकांसाठी लढा देण्यात येत आह़े 2005 च्या अगोदर नियुक्त्या झालेल्या कर्मचा:यांसाठी महासंघ शासनाकडे पाठपुरावा करत आह़े डिसिपीएसचा प्रश्नही लवकर मार्गी लावण्यात येणार आह़े मेळाव्यात प्रा़आय़डी़पाटील, प्रा़डी़एऩवाघ, प्रा़प्रशांत बागुल, प्रा़चव्हाण, प्रा़राजेंद्र शिंदे यांच्यासह विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त करत सभासदांच्या अडीअडचणी मांडल्या़ कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हासचिव प्रा़एस़एऩपाटील यांनी केल़े सुत्रसंचालन जिल्हाकोषाध्यक्ष प्रा़गणेश सोनवणे यांनी मानल़े मेळाव्यात तळोदा, धडगाव, शहादा, नंदुरबार, अक्कलकुवा येथील कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक सहभागी झाले होत़े यशस्वीतेसाठी होण्यासाठी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. भरत देसले, प्रा. डी़सी़पाटील, प्रा .अंकुश रघुवंशी सर्व जिल्हा कार्यकारिणी सदस्य यांनी परिश्रम घेतले
कनिष्ठ महाविद्यालयीन संघटनेचा जिल्हा मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 12:12 PM