नंदुरबार जिल्हा साहित्य अकादमीची बैठक गुरुवारी येथील जिल्हा वाचनालयाच्या सभागृहात झाली. अध्यक्षस्थानी अकादमीचे अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक डॉ. पितांबर सरोदे होते. तर साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष राजेंद्रकुमार गावीत यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी साहित्यिक डॉ. सुनंदा पाटील, विजय बागूल, प्रवीण पाटील, सुलभा महिरे, प्रभाकर भावसार आदी उपस्थित होते. प्रास्ताविक साहित्य अकादमीचे कार्याध्यक्ष रमाकांत पाटील यांनी केले. या वेळी साहित्य मेळाव्याच्या नियोजनासंदर्भात चर्चा झाली. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात हा साहित्य मेळावा होणार आहे. कोरोनाच्या परिस्थितीमुळे यावर्षी जिल्हा साहित्य संमेलन घेण्याऐवजी एकदिवसीय साहित्य मेळावा घेण्याचे नियोजन करण्यात आले. या मेळाव्याच्या उद्घाटनासाठी अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत देशमुख हे येणार असून त्यांनी निमंत्रण स्वीकारल्याची माहिती या वेळी देण्यात आली. राजेंद्र गावीत व डॉ. पितांबर सरोदे यांनीही या वेळी मार्गदर्शन केले. आभार प्रवीण पाटील यांनी मानले.
साहित्य अकादमीतर्फे जिल्हा साहित्य मेळावा, अ. भा. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 4:36 AM