लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शासनाने दिवाळीत स्वस्त धान्य दुकानांमधून तूर, उडीद आणि चनाडाळीचा पुरवठा करण्याचा निर्णय घेतला होता़ ऑक्टोबर महिन्यात होणा:या या निर्णयाची अंमलबजावणी दिवाळी उलटूनही रखडली असून अद्यापही गोरगरीब कुटूंबांना डाळींचा पुरवठा झालेला नाही़ यावर कारवाई करण्याऐवजी पुरवठा विभागाने राज्यात नियुक्त केलेल्या पुरवठादाराकडे बोट दाखवून अंग झटकण्याचा प्रयत्न केला आह़े दिवाळीसाठी जिल्ह्यातील 1 लाख 6 हजार 488 अंत्योदय तर 1 लाख 47 हजार 61 प्राधान्य कुटूंब शिधापत्रिकाधारकांना 35 रूपये दराने तूर आणि चनाडाळ तर 44 रूपये प्रतिकिलो दराने उडीदडाळ वितरण करण्याचा निर्णय घेतला होता़ ऑक्टोबर महिन्यात यासाठी रेशन दुकानदारांकडून पैसे रक्कम भरुन डाळींचा साठा उचलण्याची तयारी दर्शवली होती़ परंतू यानंतर गेल्या महिनाभरात दुकानदारांना तूरडाळ आणि साखरेचाच पुरवठा होऊ शकला आह़े उर्वरित दोन्ही डाळींचा पुरवठा स्वस्त धान्य दुकानांना झालेलाच नसल्याने गोरगरीब लाभार्थीचे हाल झाले आहेत़ दुसरीकडे जिल्हा पुरवठा विभागाने मागणी केलेल्या तूरडाळीची आवकही रडतखडत झाल्याची माहिती आह़े दिवाळीत 1 हजार 61 स्वस्त धान्य दुकानदारांऐवजी 366 दुकानदारांनी तूरडाळीची उचल केली होती़ आजअखेरीस 1 हजार 902 क्विंटल तूरडाळ वितरीत करण्यात आली असल्याची माहिती असली तरी दिवाळीत अनेकांच्या घरांर्पयत डाळ पोहोचली नसल्याचे सांगण्यात आले आह़े जिल्ह्यातील दीड लाख शिधापत्रिकाधारक दिवाळी सणावेळी डाळीपासून वंचित राहूनही संबधित विभागाने कारवाई केली नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आह़े राज्यशासनाने तूर, उडीद आणि चनाडाळींच्या पुरवठय़ासाठी राज्यात एकाच पुरवठादाराची नियुक्ती केली होती़ या पुरवठादाराने दिवाळी उलटल्यानंतर नंदुरबार जिल्ह्यात डाळींचा पुरवठा सुरु केल्याची माहिती पुरवठा विभागाकडून देण्यात आली आह़े परंतू दिवाळीनंतर जिल्ह्यातील बहुतांश अंत्योदय आणि प्राधान्य कुटूंब लाभार्थी हे स्थलांतर करुन गुजरात राज्यात रवाना झाल्याने विभागाने मागवलेल्या चना, आणि उडीदडाळींचे नेमके करणार काय, असाही प्रश्न उपस्थित होऊ लागला आह़े डाळींच्या पुरवठय़ाबाबत उदासिन असलेल्या पुरवठा विभागाने साखर वितरणाचेही गांभिर्य दाखवलेले नसल्याची माहिती आह़े दिवाळीकाळात जिल्ह्यासाठी 1 हजार 517 क्विंटल साखर मंजूर होती़ यापैकी 1 हजार 215 क्विंटल साखरेची आवक पुरवठा विभागाकडे झाली होती़ दुकानदारांना जिल्ह्यातील गोडावूनमधून ही साखर वितरण करण्यात आल्याची माहिती आह़े परंतू अद्यापही 302 क्विंटल साखर ही गोडावूनमध्ये पडून आह़े या साखरेचे नेमके होणार काय, याची माहिती विभागाकडे नसल्याचे समजून आले आह़े 20 रुपये प्रतिकिलो मिळणा:या किलोभर साखरेसाठी स्वस्त धान्य दुकानात चकरा मारणा:या लाभार्थीना वेळेवर साखर उपलब्ध करण्यात आलेली नसल्याचे सांगण्यात आले आह़े नंदुरबार तालुक्यात 188, नवापूर 179, शहादा 218, तळोदा 107, अक्कलकुवा 200 आणि धडगाव तालुक्यात 169 असे एकूण 1 हजार 61 दुकाने आहेत़ यातील 366 दुकानांमध्ये दिवाळी सणावेळी तूरडाळ आणि साखर उपलब्ध करुन देण्यात आल्याचे सांगण्यात आले होत़े तर उर्वरित 695 स्वस्त धान्य दुकानांमध्ये खडखडाट होता़ दिवाळी होऊनही दुकानांमध्ये हीच स्थिती कायम असल्याची माहिती लाभार्थीकडून देण्यात आली आहे.दिवाळीपूर्वी देण्यात येणा:या डाळींचा पुरवठा करण्यास 22 नोव्हेंबरपासून सुरुवात झाल्याची माहिती पुरवठा विभागाने दिली आह़े यात 200 क्विंटल उडीद डाळ आणि 900 क्विंटल चणाडाळ पाठवण्यात आल्याची माहिती आह़े यातील किती लाभार्थीना डाळी देण्यात आल्या, याबाबत मात्र पुरवठा विभागाकडून कळवलेले नाही़ बाजारभावानुसार निम्मे दरात असलेल्या डाळी काही दुकानदार खुल्या बाजारात विक्री करत असल्याचा दावा लाभार्थीचा आह़े
दिवाळीच्या चना आणि उडीदडाळीची अजूनही प्रतिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 1:02 PM