लोकमत न्यूज नेटवर्कखेतिया : शहादा तालुक्यातील सुलतानपूर येथील रोहित्र गेल्या चार दिवसापासून जळाले असल्याने ऐन दिवाळीच्या उत्सवात गावात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. दरम्यान, वीज वितरण कंपनीकडे नागरिकांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत त्वरित नवीन रोहित्र बसवून ग्रामस्थांना दिलासा देण्याचा प्रय} केला. मात्र तोही जळाल्याने गावात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे.दरम्यान, संबंधित वरिष्ठ अधिका:यांशी ग्रामस्थांनी पुन्हा संपर्क साधून याठिकाणी त्वरित उच्च क्षमतेचा नवीन रोहित्र बसवून देण्याची मागणी केली आहे. ऐन दिवसाळीच्या सणात गावात अंधाराचे साम्राज्य पसरल्याने येथील जनजीवनावर त्याचा परिणाम झाल्याचे चित्र दिसून येत आहे. रोहित्राअभावी गावात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली असून, ग्रामस्थ व मजुरांना पिण्याच्या पाण्यासाठी मजुरीस मुकावे लागत आहे. त्यामुळे संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिका:यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देवून याठिकाणी त्वरित उच्च क्षमतेचा रोहित्र उपलब्ध करून द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ग्रामप्रशासनानेही याकडे गांभीर्याने लक्ष देवून गावातील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी संबंधित विभागाच्या वरिष्ठांशी संपर्क साधून ऐन दिवाळीत गावावर परलेला काळोख दूर करण्यासाठी तत्काळ रोहित्र उपलब्ध करूण देण्याची मागणी करावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.वीजपुरवठय़ाअभावी येथील शासकीय, निमशासकीय, व्यावसायिकांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच अंधारात रस्त्यावरील गटारी व खड्डे दिसून येत नसल्याने किरकोळ अपघाताच्याही घटना घडत आहे. त्यामुळे संबंधित वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिका:यांनी ग्रामस्थांच्या सहनशीलतेची परीक्षा न घेता तत्काळ नवीन उच्च क्षमतेचे रोहित्र बसवून गावातील वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.
रोहित्र जळाल्याने सुलतानपूर येथील दिवाळी अंधारातच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2019 12:12 PM