नंदुरबार : कालर्पयत डॉक्टर म्हणून सेवा बजावणा:या तिघांच्या दारी सोमवारी प्रशासनाने कारवाईच्या गुढय़ा उभारल्या. कुठलेही वैद्यकीय प्रमाणपत्र आढळून न आल्याने धडगाव तालुक्यातील तीन बोगस डॉक्टरांविरुद्ध सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुमारदेश चंद्रसतस रॉय (42), सुरेश यशवंत साळी आणि वासेनंद्र बहादूरसिंग राजपूत (50, तिघे रा. धडगाव) अशी या बोगस डॉक्टरांची नावे आहेत. धडगाव शहर व परिसरात वैद्यकीय व्यवसाय करणा:या तीन दवाखान्यांची तपासणी आरोग्य विभागातर्फे करण्यात आली. त्यात तिघांकडे वैद्यकीय पदवीचे अधिकृत प्रमाणपत्र आढळून आले नाही. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.दिनेश उग्रावण्या वळवी यांनी फिर्याद दिली. त्यावरून या तीनही जणांविरुद्ध मेडिकल कौन्सिल अॅक्ट, महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर्स अॅक्ट व इतर कलमान्वये धडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्ह्यात यापूर्वीही दोन डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे कारवाई झालेल्या डॉक्टरांची संख्या पाच झाली आहे. चौकशीला कंटाळून लिपिकाची आत्महत्याचौकशीला कंटाळून धुळे शहरातील नकाणे तलावात उडी घेत शिंदखेडा न्यायालयातील लिपिकाने आत्महत्या केली. गजेंद्र चंडीदास देवकर (वय 43, रा़यशवंतनगर, साक्री रोड, धुळे) असे मयत कर्मचा:याचे नाव आह़े रविवारी त्यांचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आला़ त्यांच्याजवळ चिठ्ठी आढळली असून त्यात आत्महत्येचे कारण स्पष्ट करण्यात आले आह़े धुळे तालुका पोलिसात नोंद करण्यात आली आह़े
डॉक्टरांच्या दारी कारवाईची गुढी!
By admin | Published: March 27, 2017 11:45 PM