ऑनलाईन लोकमतनंदुरबार, दि़ 23 : गेल्या वर्षापासून रखडलेल्या घरकुलाच्या तिस:या हप्त्याचा रक्कमेसाठी तालुक्यातील सरपंचांनी सोमवारी गटविकास अधिका:यांना साकडे घालत तातडीने रक्कमेची शासनाकडे पाठपुरावा करण्याची मागणी केली. दरम्यान पैशांअभावी घरकुलांची कामेही रखडल्याची लाभाथ्र्याची व्यथा आहे.केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेंतर्गत तळोदा तालुक्यात सन 2016-2017 मध्ये साधारण एक हजार 238 घरकुले मंजूर करण्यात आली होती. ग्रामसभांच्या ठरावानुसार ही सर्व घरकुले संबंधीत लाभाथ्र्याना वितरित करण्यात आली आहे. एक लाख 20 हजार रुपये केंद्र सरकारचे तर 18 हजार रुपये मनरेगातून असे एकूण एक लाख 38 हजार रुपयांचे घरकुल आहे. संबंधीत लाभाथ्र्याची घरकुलासाठी निवड झाल्यानंतर प्रशासनाकडून त्यांची ऑनलाईन माहिती या विभागाने नेमलेल्या यंत्रणेकडे पाठविण्यात आली. शिवाय शासनाने घरकुल बांधकामासाठी पहिला व दुसरा हप्ता नियमानुसार लाभाथ्र्याना दिला आहे. ही रक्कम व आपल्याजवळ असलेल्या रक्कमेतून त्यांनी घरकुलांचे काम लेन्टर लेव्हलर्पयत पूर्ण केली आहे. तथापि पुढील रक्कमे अभावी घरकुलाच काम गेल्या वर्षापासून रखडले आहे. पैशांसाठी सातत्याने ग्रामपंचायतींच्या पदाधिका:यांकडे हेलपाटे मारीत आहेत. वास्तविक शासनाच्या नियमानुसार म्हणजे टप्या टप्प्यांनी लाभाथ्र्यानी घरकुलाचे काम केले आहे. त्याचबरोबर पंचायत समितीच्या बांधकाम यंत्रणेनेदेखील घरकुलाचे टप्प्यानुसार मूल्यमापन करून अहवाल दिला आहे, असे असतांना या लाभाथ्र्याना अजूनही घरकुलाची रक्कम मिळाली नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. एकीकडे शासनाने घरकुलाच्या रक्कमेत समाधानकारक वाढ केल्याबरोबरच लाभाथ्र्याकडून एका वर्षात घरकुल पूर्ण करून घेण्यावर भर देत आहे तर दुसरीकडे शासनाचीच वरिष्ठ यंत्रणा निधी उपलब्ध करून देण्याबाबत उदासिन धोरण अवलंबवत असल्याचा लाभाथ्र्याचा आरोप आहे. पंचायत समितीच्या संबंधित विभागाकडून याप्रकरणी माहिती घेतली असता सन 2016-2017 मध्ये मंजूर करण्यात आलेल्या घरकुलांपैकी 700 लाभाथ्र्याना तिस:या हप्त्याची रक्कम देण्यात आली अहे. अजून 500 लाभाथ्र्याना रक्कम मिळालेली नाही. त्यांची जी ओ टॅगींग नुसार माहिती जनरेट करण्यात आलेली आहे. मात्र त्यांच्या खात्यावर अजून रक्कम मिळाली नसल्याचे सांगण्यात आले. वास्तविक यातील बहुतेक लाभाथ्र्यानी शासनाकडून घरकुलाचा पैसा मिळेल या आशेवर उधार-उसनवार पैसे घेवून घरकुलाचे काम पूर्ण केले आहे. मात्र पैशांसाठी आता सावकार तगादा लावत आहे. साहजिकच लाभार्थी अक्षरश: मेटाकुटीस आला आहे. घरकुल योजनेतील दलाली थांबवून त्याचात पारदर्शकता आणण्याचा शासनाचा चांगला हेतू असला तरी निधी थेट लाभाथ्र्याना देण्याबाबत सुद्धा तत्परता दाखविण्याची लाभाथ्र्याची अपेक्षा आहे. पैशांसाठी वैतागलेल्या लाभाथ्र्याची कैफीयत ऐकूण तालुक्यातील सरपंच संघटनेचे अध्यक्ष बळीराम पाडवी, मोरवडचे सरपंच प्रविण वळवी, शानु वळवी, यशवंत पाडवी, चंदन पाडवी, भिकलाल वळवी, अरूणाबाई पाडवी, विनोद पाडवी, उषाबाई गावीत, मंगलाबाई पावरा आदी सरपंचांनी सोमवारी गटविकास अधिकारी मंगला खर्डे यांची भेट घेवून घरकुलाच्या निधीबाबत विचारणा केली होती. पैशांअभावी अनेकांची घरकुले रखडली आहेत. काहींनी उधार-उसनवारीने पैसे घेऊन घरकुले कपबशी पूर्ण केली आहेत, अशी कैफीयत अधिका:यांपुढे मांडून तातडीने रक्कम उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा करण्याची विनंती केली होती. याप्रकरणी वरिष्ठांकडे पाठपुरावा केला आहे. त्यामुळे लवकरच लाभाथ्र्याना पैसे उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले, असे असले तरी जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ प्रशासनाने याप्रकरणी दखल घेऊन संबंधीत लाभाथ्र्याना घरकुलाची थकीत रक्कम उपलब्ध करून देण्याची मागणी ग्रामपंचायतीच्या पदाधिका:यांनी केली आहे.
अनुदानाअभावी घरकुलाची कामे रखडली : तळोदा तालुका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 12:20 PM