लहान मुलांचे आकर्षण
खासकरून लहान मुलांना समोर ठेवून पतंगनिर्मिती करणाऱ्या विविध कंपन्यांकडून पतंगांची निर्मिती करण्यात आली आहे. यात गो-कोरोना-गो पतंग, डोरेमॉन, छोटा भीम, माेटू पतलू, ॲंग्री बर्ड, टॉम ॲण्ड जेरी, चमकी झाला यांचा समावेश आहे. पाच पतंगांचा एक संच याप्रमाणे त्याची विक्री केली जाते. एक पतंग संच साधारण १० ते ५० रुपयांच्या दरात मिळतात.
मोठ्यांसाठी खास तयारी
किशोरवयीन युवक ते वृद्धांपर्यंत पतंगोत्सवाचा आनंद लुटण्याची परंपरा नंदुरबारात आहे. त्यांच्यासाठी गोंडारे, बडे, छत्री पतंग, चिल, रॉकेट, झब्बे, पक्ष्यांच्या आकारातील पतंग, दोन डोळे, एक डोळा, चांदतारा आदी पतंग मागवण्यात आले आहेत. ३० ते ३५० रुपयांपर्यंत या पतंगांच्या किमती आहेत.
मांजासाठी खास ऑर्डर
पतंगोत्सवात दुसऱ्याचा पतंग कापता यावा यासाठी खास दोरा तयार करून घेण्याची पद्धत नंदुरबारात आहे. यात एक हजार मीटर मांजासाठी ४० रुपये, तर अडीच हजार व पाच हजार मीटर मांजा तयार करून देण्यासाठी १०० ते २०० रुपये दर आकारले जातात. सरस आणि भात यांच्या मिश्रणात तयार केलेल्या दोऱ्याला अर्थात मांजाला मोठी मागणी आहे. यात प्रामुख्याने साखला ३२० ते ६५० रुपये, पांडा ३६० ते ९५०, गेंडा ६५०, एक-५६ ३८० ते८८०, महासाखला ४५० ते ६५०, आरडीएक्स ६५० रुपये या दरात मिळत आहे. साधारण ५०० मीटर दोरा १५० रुपयात मिळतो. एक हजार मीटर २२० ते ४५०, अडीच हजार मीटर ५५० ते ९००, तर पाच हजार मीटर मांजा दीड हजार रुपयात उपलब्ध आहे. मांजासोबतच विविध प्रकारच्या चक्रीही बाजारात उपलब्ध झाल्या असून, रिकामी चक्री ३० ते ९० रुपयांना उपलब्ध आहे.