संतोष सूर्यवंशी / ऑनलाईन लोकमतनंदुरबार, दि. 31 - नंदुरबार : घरात अठराविश्व दारिद्रय.वय वर्ष बारा असताना वडीलांचे व त्यानंतर आईचे छत्र हरपल़े शिवाय जन्मजात दिव्यांग असल्याने शारीरिक बंधने ही आलीच़ परंतु यातूनही मार्ग काढत दिव्यांगातून सामथ्र्यवान होण्याचे स्वप्न उराशी बाळगून बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन यशाला गवसणी घातली़ ही कहाणी आह़े पंकज नारायण गिरासे या युवकाची़ नंदुरबार येथील डी़आऱ हायस्कूलमध्ये बारावीचा विद्यार्थी असलेल्या पंकज नारायण गिरासे याने बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन यश मिळविले आह़े जन्मजात दोन्ही हात व पायाने दिव्यांग असलेल्या पंकजने आपल्या मेहनतीने, जिद्द-चिकाटीने बारावीच्या परीक्षेत यश मिळवून दिव्यांग असल्याचा न्युनगंड बाळगून खचून जाणा:या मुलांसमोर यानिमित्ताने एक आदर्शच घालून दिला असल्याचे म्हटले जात आह़े ज्या वयात मुले आपल्या बाबांकडून आपले हट्ट पुरवून घेतात अगदी त्याच वयात जेमतेम 12 वर्षाचा असताना पंकजचे वडील नारायण गिरासे यांचा अपघाती मृत्यू ओढावला़ या ेकाळाच्या घाल्यामुळे केवळ त्याच्या बालपणच हिरावले नाही तर त्याला या लहान वयातच खरी खोटी माणसेही मानसेही समजू लागली़ 2005 साली वडीलांचे निधन झाल्याने लागलीच पाच वर्षानी म्हणजे 2015 साली काविळने आईचेही निधन झाल़े आधीच वडीलांचे छत्र हरविलेल्या पंकजच्या डोक्यावरुन आईच्या मायेचा हातही गेल्याने त्याची हिम्मत खचतच गेली़ शिवाय जन्मापासून दिव्यांग असल्याने इतर नातेवाईकांनीही जबाबदारी घेण्यास नकार दिला़ परंतु त्याने पुन्हा एकदा नव्या उमेदीने आलेल्या परिस्थितीचा सामना करायचे ठरवले यात त्याला साथ दिली त्याचे मोठी बहीण निलिमा गिरासे व काका ओंकार राजपूत यांनी़ पंकजचे सातवी ते दहावीर्पयतचे शिक्षण पुणे येथील अपंग कल्याण शिक्षण संस्थेत केल़े पुढे आयटीला प्रवेश घेण्यासाठी अर्ज केला असता संबंधित संस्थेचे महाविद्यालय हे सातव्या माळ्यावर असल्याने त्यांनी दिव्यांगांसाठी सोयी नसल्याचे सांगत पंकजचा प्रवेशही नाकारला़ त्यामुळे आयटी क्षेत्रात जाण्याची इच्छा असतानाही त्याला प्रवेश मिळू शकला नाही़ त्यामुळे त्याने अकरावीला नंदुरबार येथील डी़आऱ हायस्कूल येथे कला शाखेत प्रवेश घेतला़ याठिकाणी उत्तम मार्गदर्शक म्हणून प्रा़ उमेश शिंदे यांचीही पंकज यास उत्तम साथ मिळाली़ बारावीच्या परीक्षेलाही पंकजला प्रा़ शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले व सोबत काका व बहीणीचीही साथ होतीच़ बारावीची परीक्षा उत्तीर्ण होण्याची पंकजची जिद्द होती़ त्यानूसार त्याने प्रतिकूल परिस्थितीचा सामना करीत रात्रन्दिवस एक करुन जानेवारी महिन्यापासून बारावीच्या परीक्षेचे व अभ्यासाचे नियोजन केल़े
दिव्यांगातून सामथ्र्यवान होण्याचे स्वप्न
By admin | Published: May 31, 2017 5:32 PM