लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 17 : तालुक्यातील वडवद शिवारातून एकाच रात्रीतून दोन शेतात ठिबक नळ्यांची चोरी झाली़ या चोरीमुळे या भागात एकच खळबळ उडाली असून पोलीसात गुन्हा दाखल ्व्हावा म्हणून शेतक:यांची फिरफिर करत आहेत़ खोंडामळी येथील नाना काशिराम पाटील यांच्या वडवद शिवारातील दीड एकर क्षेत्रापैकी एक एकर क्षेत्रात ठिबक नळ्या टाकल्या होत्या़ 15 मार्च रोजी अज्ञात चोरटय़ांनी या नळ्या चोरून नेल्या होत्या़ दरम्यान नंदाबाई ईश्वर जमदाडे यांच्या गट क्रमांक 2 मधील तीन एकर क्षेत्रात टाकण्यात आलेल्या ठिबक नळ्या अज्ञात चोरटय़ांनी चोरून नेल्या़ सकाळी हा प्रकार लक्षात आला़ याबाबत नंदाबाई ईश्वर जमदाडे व नाना पाटील यांनी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात यावा, यासाठी अर्ज दिला आह़े मात्र त्यांच्या अर्जाची दखल घेण्यात आलेली नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आह़े या भागात गेल्यावर्षापासून चोरटे नळ्या चोरत असल्याचे प्रकार घडत आहेत़ यातून शेतक:यांचे मोठय़ा प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आह़े सायंकाळी सात वाजेनंतर शेतात शेतकरी जात नसल्याने चोरटे घुसखोरी करून चो:या करत आहेत़ हे प्रकार थांबवण्यासाठी तालुका पोलीस ठाण्याने शेतक:यांच्या बैठका घेत कारवाई करण्याची अपेक्षा शेतक:यांची आह़े खोंडामळी, विखरण,वडवद, हाटमोहिदा यासह विविध गावांमधून जाणा:या मालवाहू वाहनांची तपासणी करण्याची अपेक्षा शेतक:यांची आह़े रात्रीच्यावेळी नंदुरबारकडून सारंगखेडा शिरपूरकडून येणारी वाहने या मार्गाने येतात़ यात काही टेम्पोचालक हे शेतशिवारात थांबून चो:या करत असल्याचे प्रकार यापूर्वीही उघडकीस आले आह़े गेल्यावर्षी वावद येथे एकास याच प्रकार ताब्यात घेण्यात आले होत़े प्रकाशा ते रनाळे मार्गाचा वापर करत चारचाकी वाहन घेऊन हिंडणारे सायंकाळी चो:या करत असल्याचे अनेकवेळा दिसून आल्यानंतर शेतक:यांनी पोलीसांना माहिती दिल्याचे सांगण्यात येऊनही कारवाई करण्यात आलेली नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आह़े नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने या भागात गस्त घालून शेतक:यांना सुरक्षा देण्याची अपेक्षा व्यक्त होत आह़े
वडवद शिवारातून ठिबक नळ्यांची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 12:32 PM