महसूल विभागाने एमएच १५ एफव्ही ८०८५ हा ट्रक पकडला होता. गुजरात राज्यातून नाशिक जिल्ह्यात वाळू घेऊन जाणाऱ्या या वाहनधारकाकडे महाराष्ट्रातून वाहतूक करण्याची राॅयल्टीची पावती नसल्याने पथकाने त्याच्यावर कारवाई करुन वाहन ताब्यात घेतले होते. दरम्यान, १५ रोजी हे वाहन तहसील कार्यालयाच्या आवारात लावण्यात आले होते. दरम्यान, शुक्रवारी पहाटेच्या सुमारास चालक सतीश राजोळे रा.नाशिक याने प्रशासनाची परवानगी नसताना वाळूसह वाहन चोरून नेले. हा प्रकार सकाळी उघडकीस आल्यानंतर, प्रशासनात एकच चर्चा सुरू झाली होती. दरम्यान, याबाबत कठोर कारवाईचे आदेश तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्याकडून देण्यात आले होते. याबाबत झनक कचरू गायकवाड यांनी उपनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून संशयित सतीश राजोळे याच्याविरोधात उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक यादव भदाणे करत आहेत.
तहसील कार्यालयात जप्त केलेला वाळू भरलेला ट्रक घेऊन चालक फरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 4:22 AM