नंदुरबार : श्रीलंकेजवळील बंगालच्या उपसागरात तळाशी द्रोणीय भागाची निर्मिती झाली आह़े त्यामुळे वा:यांच्या दिशेत बदल होऊन परिणामी उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानात काही अंशी वाढ झाली आह़े येत्या काही दिवसात हीच स्थिती कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आह़े नंदुरबारात बुधवारी 31.2 कमाल तर 13 अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदविण्यात आल़े वातावरणीय बदलामुळे उत्तर महाराष्ट्रात किमान व कमाल तापमानात वाढ होण्याचा अंदाज ‘आयएमडी’च्या हवामानतज्ज्ञ डॉ़ शुभांगी भुते यांनी वर्तविला़ ‘लोकमत’ला अधिक माहिती देताना त्या म्हणाल्या की, श्रीलंकेजवळ बंगालच्या उपसागरात तळाशी द्रोणीय स्थिती निर्माण झालेली आह़े यामुळे त्या ठिकाणी कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन परिणामी वा:यांची दिशा बदलली आह़े सध्या उत्तर महाराष्ट्रासह राज्यात दक्षिणेकडून-पुव्रेकडे वारे वाहत आहेत़ त्यामुळे तापमानात वाढ होण्याची शक्यता वाढत आह़े उत्तर महाराष्ट्राची स्थितीनंदुरबारात बुधवारी 31.2 कमाल तर 13 अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदविण्यात आल़े तर, जळगावात कमाल 29.7, किमान 10.4, धुळे कमाल 31.1 तर, किमान 11.1, नाशिक कमाल 30.2 तर किमान 10.2, मालेगाव कमाल 28 तर किमान 12 अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदविण्यात आले आह़े दरम्यान, आयएमडीकडून देण्यात आलेल्या इशा:यानुसार उत्तर महाराष्ट्रात ताशी 20 ते 25 किमी गतीने वारे वाहण्याचे सांगण्यात आले आह़े त्यामुळे उत्तरेकडून येणा:या शितलहरींना अडथळा निर्माण होऊन परिणामी थंडीत घट दिसून येईल़ दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून नंदुरबारात सकाळी तसेच रात्रीच्या वेळी थंडी जाणवत आह़े तर दुपारच्या वेळी काही प्रमाणात उकाडा आह़े नंदुरबारात संमिश्र वातावरण असल्याचे दिसून येत आह़े दरम्यान, बंगालच्या उपसागरात सध्या द्रोणीय भागामुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आह़े परंतु तुर्त चक्रीवादळाचा धोका नसल्याचे सांगण्यात आले आह़े दरम्यान, विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात घट दिसून आली़ तसेच मध्य महाराष्ट्रातही किमान तापमान खाली गेले होत़े तसेच उर्वरीत राज्यात किमान तापमाना एक ते दोन अंश सेल्सिअसने वाढ झालेली होती़ राज्यातील प्रमुख शहरांमधील किमान तापमान : मुंबई (कुलाबा) 20.5, सांताक्रुझ 18.0, अलिबाग 18.8, रत्नागिरी 18.9, पणजी (गोवा) 19.1, डहाणू 17.7, पुणे 11.8,अहमदनगर 10.6, जळगाव 10.0, कोल्हापूर 16.5, महाबळेश्वर 14.6, मालेगाव 11.6, नाशिक 11.0, सांगली 13.4, सातारा 13.4, सोलापूर 15.6, औरंगाबाद 12.0, परभणी 13.0, अकोला 11.7, अमरावती 11.4, बुलडाणा 12.0, चंद्रपूर 11.8, गोंदीया 8.0, नागपूर 7.3, यवतमाळ 14.4 अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आल़े कोरडय़ा हवामानातचा अंदाजराज्यात 20 जानेवारीर्पयत अंशत: कोरडे हवामान राहणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेकडून वर्तविण्यात आला आह़े त्यामुळे विदर्भात थंडीची लाट निर्माण होण्याचीही शक्यत वर्तविण्यात आली आह़े सर्वसाधारणत: संपूर्ण जानेवारी महिना थंडीचा जोर असतो़ तर त्यानंतर फेब्रुवारीपासून परतीच्या प्रवासाला सुरुवात होत असत़े यंदा संपूर्ण उत्तर महाराष्ट्र, मराठवाडय़ात कमी पजर्न्यमानामुळे दुष्काळी स्थिती निर्माण झाली होती़ त्यामुळे हिवाळा पाहिजे तसा जानवणार नसल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत होता़ परंतु यंदा थंडीचा मुक्काम जानेवारीर्पयत कायम राहणार असल्याचे दिसून येत आह़े
आठवडाभर कोरडय़ा हवामानाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 3:06 PM