कोठार : सातपुडा पर्वत चांदसैली व देवगोई घाटात अनेक ठिकाणी रविवारी दरडी कोसळल्या आहेत. त्यामुळे येथील वाहतूक विस्कळीत झाली असून घाटातील वाट अधिकच बिकट बनली आहे.दरवर्षी पावसाळ्यात सातपुडय़ातील सर्व घाटमार्गात दरडी कोसळण्याच्या घटना घडतात़ या वर्षीदेखील सातपुडय़ातील अक्कलकुवा-मोलगीला जोडणा:या देवगोई घाट, तळोदा-धडगांव दरम्यानचा चांदसैली घाट या प्रमुख घाटाव्यतिरिक्त भरडीपादर ते कुवा दरम्यानचा घाट, कुंडी ते होराफळी दरम्यानचा घाट, दहेलचा घाट, या घाटातदेखील दरळी कोसळल्या आहेत. यातील देवगोई व चांदसैलीच्या घाटात सर्वाधिक वाहतुकीची वर्दळ असते. दरडी कोसळल्याने रस्त्यावर लहान-मोठे दगड पडलेले दिसून येत आहे. बारीक मुरून व मातीचे ढिगारे देखील निर्माण झाले आहे. सातपुडय़ाच्या पर्वत रांगामध्ये तुरळक पावसाची रिपरिप मागील आठ ते दहा दिवसापासून सुरू आहे. त्यामुळे कोसळलेल्या दरडीच्या दगड-मातीमुळे घाटमार्गात अनेक ठिकाणी रस्त्यावर चिखल निर्माण झाला आहे. घाटातील तीव्र चढाव-उतार व त्यातच दरडीच्या मातीमुळे निर्माण झालेला चिखल या परिस्थितीमुळे वाहने घसरण्याची शक्यता असते. अनेकदा दरडी कोसळल्याने रस्त्यावर दगड व बारीक मुरूम पसरतात़ त्यामुळेदेखील अनेक छोटे-मोठे अपघात होत असतात़या सर्व परिस्थितीमुळे घाटातील वाट अधिकच बिकट बनली आहे. त्यामुळे प्रवाशांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. घाटात दरडी कोसळल्याने वाहतूक विस्कळीत होऊ नये यासाठी प्रशासनाकडून करण्यात आलेल्या उपाययोजना या अपूर्ण ठरत आहे. काही ठिकाणी घाट मार्गात डोंगराच्या कडेला जेसीबीने चारी खोदून पाणी प्रवाहित करण्याच्या प्रय} केलेला आह़े तर काही ठिकाणी दरडी कोसळू नयेत यासाठी पक्क्या संरक्षक भिंती बांधल्या असल्याचे दिसून येते. काही ठिकाणी दरळी कोसळल्या तर वाहतूक ठप्प होऊ नये यासाठी दरडीचे दगड व माती हटविण्यासाठी जेसीबी उपलब्ध असल्याचेदेखील सांगण्यात येत आहे. परंतु जेसीबी उपलब्ध असतांना देखील घाटात अनेक ठीकाणी दरडी कोसळल्यामुळे रस्त्याच्या कडेला व रस्त्यावर निर्माण झालेले दगड व माती ढिगारे हटविण्यात आलेले नसल्याची स्थिती आहे. या ठिकाणी प्रशासनाने दरडी कोसळू नये म्हणून नेटच्या जाळ्या लावाव्यात अशी मागणी वाहनधारकांकडून करण्यात येत आह़े वास्तविक आपत्ती व्यवस्थापन विभागा व सार्वजनिक बांधकाम विभागा यांनी समन्वय साधत पावसाळ्यापूर्वीच ही कामे करणे गजरेची होती़ परंतु तसे न झाल्याने या समस्या निर्माण होत आह़े
दरडी कोसळल्याने वाहतुकीवर परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2018 5:02 PM