नंदुरबार : राज्यात सध्या 1 हजार 14 हेक्टापास्कल इतका हवेचा दाब निर्माण झाल आह़े हवेच्या दाबात चढउतार होत असल्याने परिणामी शनिवारी उत्तर महाराष्ट्रासह राज्यात किमान तापमानात वाढ झाल्याचे चित्र बघायला मिळाल़े खान्देशातील ‘कोल्ड सिटी’ म्हणून ओळख निर्माण केलेल्या धुळ्यात शनिवारी 11.2 अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदविण्यात आल़े कमी दाबाचे पट्टे निर्माण झाल्याने उत्तरेकडून येत असलेल्या शितलहरींच्या मार्गात अडथळा निर्माण झाला असल्याचे जेष्ठ हवामान तज्ज्ञ डॉ़ रामचंद्र साबळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितल़े दरम्यान, दोन दिवसात पुन्हा हवेचा दाब वाढणार असून यामुळे 14 ते 16 जानेवारी दरम्यान थंडीची लाट परतणार आह़े पुढील दोन दिवसात महाराष्ट्रात 1 हजार 16 हेक्टापास्कल इतका हवेचा दाब निर्माण होण्याची शक्यता आह़े हवेचा दाब वाढल्यास थंडीत वाढ होते व हवेचा दाब कमी झाल्यास थंडीतही घट होत आह़े 3 ते 4 अंशाने झाली घटशनिवारी नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार व शहादा येथील किमान तापमानात सरासरी 3 ते 4 अंशाने वाढ झालेली दिसून आली़ नाशिक : कमाल 28.8 तर किमान 8.8, जळगाव : कमाल 29.7 तर किमान 10, धुळे : कमाल 30.2 तर किमान 11.2, नंदुरबार : कमाल 29.7 तर किमान 13.8 तसेच शहादा येथे किमान 11 अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले आह़े आठवडय़ापासून जळगाव व धुळे येथे अनुक्रमे 6 व 5 अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदविण्यात येत होत़े तसेच शहादा येथेही गेल्या तीन दिवसांपासून किमान तापमान 7 अंश सेल्सिअस इतके होत़े परंतु शनिवारी सर्वच ठिकाणी किमान तापमानात वाढ बघायला मिळाली आह़े हवेच्या दाबात मोठय़ा प्रमाणात चढउतार होत असल्याने परिणामी थंडीतही लक्षणीय बदल दिसून येत आहेत़ येत्या दोन ते तीन दिवसात खान्देशात पुन्हा थंडीची लाट परतणार असल्याचा इशारा आयएमडीतर्फे देण्यात आला आह़े (स्त्रोत : आयएमडी, पुणे)
महाराष्ट्रात सध्या 1 हजार 14 हेक्टापास्कल इतका हवेचा दाब निर्माण झाला आह़े सध्या हवेचा दाब कमी असल्याने थंडीत घट होऊ शकत़े परंतु दोन दिवसात पुन्हा थंडी परतणार आह़े-डॉ़ रामचंद्र साबळे, जेष्ठ हवामान तज्ज्ञ