संतोष सूर्यवंशी । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नंदुरबारात गेल्या 16 वर्षानंतरचे गंभीर जलसंकट यंदाच्या वर्षात येऊ पाहत आह़े जिल्ह्यात आतार्पयत सरासरी 563.21 मीमी व 67.38 टक्के इतक्याच पावसाची नोंद करण्यात आली आह़े खान्देशातील जळगाव व धुळ्याची स्थितीही काही वेगळी नाही़ गेल्या वर्षीे पडलेला पाऊस, सरासरी पडणारा पाऊस व यंदा आतार्पयत (20 सप्टेंबर) झालेला पाऊस यात मोठी तफावत आह़ेकाही दिवसांत सुरु होणा:या परतीच्या पावसावरच आता खान्देशाची भिस्त अवलंबून असल्याचे जाणकारांकडून सांगण्यात येत आह़े परतीच्या पावसाला सुरुवात साधारणत: सप्टेंबरच्या शेवटापासून होत असत़े गेल्या काही वर्षातील परतीच्या पावसाची सुरुवात पाहिल्यास दहा वर्षात तब्बल 6 वेळा परतीच्या पावसाची सुरुवात ही ऑक्टोबरच्या दुस:या आठवडय़ापासून झालेली दिसून येत़े हवामान खात्याकडून यंदा परतीचा पाऊस सप्टेंबरच्या शेवटापासून सुरु होईल असे सांगण्यात आले आह़े परंतु प्रत्यक्षात त्या-त्या वेळच्या भौगोलिक परिस्थितीवर हे अवलंबून असल्याचे जाणकारांकडून सांगण्यात येत आह़े देशात परतीच्या पावसाची सुरुवात पश्चिम राजस्थान, दक्षिण गुजरात तसेच कच्छच्या प्रदेशापासून होत असत़े तर परतीच्या पावसाचा शेवटचा टप्पा हा महाराष्ट्र समजला जात असतो़ तसेच परतीच्या पावसाचा कालखंड संपायला साधारणत: नोव्हेंबर महिना उजाडत असतो़ आतार्पयच्या पावसाची तुलनात्मक आकडेवारीसप्टेंबर हा पूर्णत: पावसाचा महिना म्हटला जात असतो़ परंतु खान्देशात सप्टेंबर महिनाच कोरडा जात असल्याने साहजिकच आता सर्वाचे लक्ष परतीच्या पावसाकडे लागले आह़े त्यामुळे जुन ते सप्टेंबर्पयत झालेल्या पावसाची आकडेवारीचा तुलनात्मक अभ्यास करणे महत्वाचे ठरत़े नंदुरबार जिल्ह्याचा विचार करता सप्टेंबर महिन्यार्पयत सरासरी 825 मीमी पाऊस अपेक्षीत असतो़ 2017 मध्ये 739़3 मीमी इतक्या पावसाची नोंद करण्यात आली होती़ तर यंदा आतार्पयत केवळ 505 मीमी इतक्याच पावसाची नोंद करण्यात आली आह़ेजळगावात सप्टेंबर महिन्यार्पयत सरासरी 654 मीमी पाऊस होतो़ सप्टेंबर 2017 मध्ये 480.4 मीमी पावसाची नोंद करण्यात आली होती़ तर यंदा केवळ 432.3 मीमी इतकाच पाऊस झाला आह़े धुळे जिल्ह्यात सरासरी 522.9 मीमी पाऊस होतो़ गेल्या वर्षी 487.4 मीमी पाऊस झाला होता़ तर यंदा सप्टेंबर 2018 र्पयत केवळ 404.3 मीमी इतकाच पाऊस झालेला आह़े तिन्ही जिल्ह्यात सरासरी पाऊस, मागील वर्षी झालेला पाऊस व यंदा होत असलेल्या पावसात मोठी तुट दिसून येत आह़े 10 ऑक्टोबर र्पयत परतीच्या पावसाची प्रतीक्षावा:यांच्या वेग कमी असल्याने परतीच्या पावसाला अडथळा निर्माण होऊ शकतो अशी भिती हवामानतज्ज्ञ व एमपीकेव्ही राहुरी कृषी विद्यापीठाचे माजी विभाग प्रमुख डॉ़ रामचंद्र साबळे यांनी ‘लोकमत’शी बोलता व्यक्त केली आह़े ईशान्येकडून वारे वाहत असतात़ वारे वाहण्याचे चक्र सध्या उलटय़ा दिशेने सुरु आह़े त्यामुळे जास्त दाबाचे वारे निर्माण होऊ परिणामी पावसाचा खोळंबा होत़
खान्देशातील पजर्न्यमानाचा घसरता आलेख चिंतेचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2018 1:03 PM