लोकमत न्यूज नेटवर्कधडगाव : सातपुडय़ात सर्वाधिक सहाय्यकारी ठरणारी दूरसंचार विभागाची मोबाईल सेवा गत दोन दिवसांपासून पुन्हा बंद पडली आह़े दूरसंचार विभागाने वीज बिलाचा भरणा न केल्याने वीज कंपनीने कनेक्शन पुन्हा कापले आह़े दरम्यान दूरसंचार विभागाच्या अधिका:यांनी केलेल्या विनंतीआधारे धडगाव आणि काकर्दा येथील टावर सुरु असून शनिवार्पयत बील न भरल्यास ही जोडणीही बंद होणार आह़े दूरसंचार विभागाकडे वीज वितरण कंपनीचे साधारण साडे आठ लाख रुपयांपेक्षा अधिक वीज बिल थकीत होत़े त्यांच्याकडून विभागाला नोटीसा देण्यात आल्या होत्या़ कंपनी आणि दूरसंचार विभाग यांच्यात चर्चा झाल्यानंतर मुदतवाढ देऊन निपटारा केला गेला होता़ परंतू मुदतवाढ देऊनही दूरसंचार विभागाने तालुक्यात उभारलेल्या आठ टावरचे विजबिल न भरल्याने ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात सर्व आठ टावरचे वीज कनेक्शन कापण्यात आले होत़े यानंतर पुन्हा तोडगा निघून सेवा सुरु झाली़ परंतू गत दोन दिवसांपासून केवळ धडगाव आणि काकर्दा हे दोन टावर सुरु ठेवत उर्वरित सहा टावरचे कनेक्शन कापले आह़े शनिवार्रयत बील न भरल्यास कंपनीकडून वीज पुरवठा बंद करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आह़े वीज बिलासाठी असलेला निधीच न आल्याने दूरसंचार हतबल झाल्याचे सांगण्यात येत आह़े या प्रकारामुळे ग्राहक वेठीस धरले जात असून दूरसंचार सेवेतील ब्रॉडबँड पूर्णपणे बंद पडल्याने दैनंदिन व्यवहार ठप्प झाले आहेत़ यामुळे साधारण 60 हजार नागरिकांना फटका बसला आह़े याबाबत ग्राहकांना अधिकृत माहिती नसल्याने त्यांच्याकडून शासकीय कार्यालयात चौकशा सुरु होत्या़ परंतू दूरसंचारची वीज कापली गेल्याची माहिती मिळाल्यानंतर नाराजी व्यक्त करण्यात आली़ दूरसंचार बंद झाल्याने तालुक्यातील नागरिक संपर्कहीन झाले आहेत़धडगाव येथील स्टेट बँकेसह इतर राष्ट्रीयकृत बँक आणि मिनीबँकांचे व्यवहार दोन दिवस बंद असल्याने नागरिकांची गैरसोय झाली होती़ सेतू केंद्रासह तलाठींकडून मिळणारे विविध ऑनलाईन दाखल्यांसाठी नागरिकांची फिरफिर होत होती़ वीज कनेक्शन कापलेल्या दूरसंचार विभागाच्या मोबाईल टावरचे सहा महिन्यांपासून वीज बिल भरण्यात आलेले नसल्याची माहिती समोर येत आह़े शनिवारी तोडगा न निघाल्यास ग्राहकांना सेवा बंद पडल्याचा भरुदड सोसावा लागणार आह़े दूरसंचार विभागाच्या धडगाव येथील मुख्य कार्यालयाचे वीज बिल हे तीन लाख रुपये असल्याने वीज पुरवठा बंद करण्यात आला होता़ दूरसंचार विभागाने विनंती केल्यानंतर काकर्दा आणि धडगाव येथील वीज पुरवठा सुरु केला तर दुसरीकडे तोरणमाळ, घाटली, कात्री, सुरवाणी, सिसा, खुंटामोडी, खामला आणि चुलवड येथील टावर बंद आहेत़ तोरणमाळ टावरचे 15 हजार 20, घाटली 7 हजार, कात्री 30 हजार 40, सुरवाणी 15 हजार 300, सिसा 20 हजार 556 तर खुंटामोडी येथील दूरसंचार विभागाच्या टावरचे वीजबिल 24 हजार 70 रुपये थकले आहेत़ एकूण 8 लाख 31 हजाराचे हे बिल भरण्याबाबत दूरसंचार विभागाकडे तरतूद नसल्याचे दिसून आले आह़े 6 ते 10 ऑगस्टदरम्यान धडगाव तालुक्यात अतीवृष्टीमुळे दूरसंचार सेवा 15 दिवसांर्पयत बंद होती़ आता पुन्हा सेवा बंद पडल्याने ग्राहकांना नाहकचा त्रास सुरु आह़े यात धडगाव व परिसरात ब्रॉडबँड सेवा वापरणा:या व्यावसायिकांना 15 दिवस सेवा बंद असूनही महिन्याचे बील द्यावे लागत असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आह़े प्रशासनाने याकडे गांभिर्याने लक्ष देऊन कारवाई करण्याची अपेक्षा आह़े धडगाव तालुक्यातील बँका आणि शासकीय कार्यालयांमध्ये ऑनलाईन कामेच होत नसल्याने चिंता वाढल्या आहेत़ शनिवारी योग्य तोडगा न निघाल्यास सेवा पुन्हा बंद पडण्याची भिती आह़े याठिकाणी खाजगी कंपनी सेवा देत असली तरी त्यातून योग्य ते नेटवर्क नसल्याने अडचणी येत आहेत़
दूरसंचार विभागाच्या दिरंगाईमुळे ग्राहक वेठीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2019 12:59 PM