लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : दिवाळीनिमित्त नंदुरबारातील बाजारपेठांमध्ये ग्राहकांची विविध वस्तूंची खरेदी करण्यासाठी गर्दी दिसून येत आह़े त्याच प्रमाणे असाच उत्साह ऑनलाईन शॉपिंगलाही दिसून येत आह़े सणासुदीच्या दिवसांमध्ये ग्राहकांकडून थेट दुकानात जाऊन खरेदी करण्याबरोबरच ऑनलाईन पध्दतीनेही खरेदी करण्यात येत आह़े वेळ वाया जाणे व धावपळ होण्यापासून वाचण्यासाठी ग्राहकांकडून ऑनलाईन पध्दतीचा वापर जास्त करण्यात येत आह़ेविविध कंपन्यांकडून मिळतेय सुटऑनलाईन पध्दतीने वस्तूंची खरेदी केल्यावर विविध कंपन्यांकडून प्रत्येक खरेदीवर ग्राहकांना सुट देण्यात येत आह़े त्यामुळे जास्तीत जास्त ग्राहक याकडे आकर्षित होत असल्याचे चित्र दिसून येत आह़े ऑनलाईन पध्दतीने खरेदी करण्यात येणा:या वस्तूंवर दिवाळीनिमित्त विविध ऑफरदेखील देण्यात आल्या आहेत़ त्यामुळे ग्राहकांचा याकडे ओढा वाढत आह़े वेळेचीही होतेय बचतदिवाळीच्या पावण पर्वास सोमवारपासून सुरुवात झाली आह़े त्यामुळे साहजिकच फराळ, नवीव वस्तूंची खरेदी आदींसाठी ग्राहकांकडून बाजारपेठेत गर्दी करण्यात येत आह़े गर्दीमुळे होणारी धावपळ व खरेदीसाठी होणारा विलंब टाळण्यासाठी काही ग्राहकांकडून प्रत्यक्ष बाजारपेठेत न जाता ऑनलाईन पध्दतीनेच खरेदी करण्यात येत आह़े वस्तूंची होतेय चाचपणीऑनलाईन शॉपिंगमध्ये ग्राहकांना आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंची चाचपणी करता येत आह़े त्यातील गुण-दोष तसेच व्हरायटी आदींचीही पडताळणी ऑनलाईन शॉपिंगमध्ये होत आह़े वस्तूंची खरेदी करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध असल्याने ग्राहकांचा कल सर्वाधिक ऑनलाईन शॉपिंगकडेच असल्याचे दिसून येत आह़े आताची तरुण पिढी वस्तूंची खरेदी करताना अनेक वस्तूंची पडताळणी करीत असत़े वस्तू खरेदी करताना कुठल्या संकेतस्थळावर ठराविक वस्तूूची किंमत इतरांच्या तुलणेत कमी आहे, खरेदीवर किती टक्के सुट आहे, खरेदीसोबत अतिरिक्त मिळणारे फायदे कुठे जास्त आहेत आदींची चाचपणी यामाध्यमातून करण्यात येत आह़े ऑनलाईन शॉपिंगमध्ये अनेक पर्याय असून पाहिजे ती वस्तू एका क्लिकवर उपलब्ध होत असल्याने याकडे ग्राहकांचा व खास तरुण पिढीचा कल वाढला असल्याचे दिसून येत असत़े
दिवाळीनिमित्त नागरिकांमध्ये लगबग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 1:16 PM