लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : आवक घटल्याने आंब्याच्या दरात मोठी वाढ झाली आह़े त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांकडून काहीशी नाराजी व्यक्त करण्यात येत आह़े सध्या आंध्र प्रदेशातून आंब्याची आवक होत आह़ेमध्यंतरी झालेली गारपीठ तसेच प्रतिकुल वातावरणामुळे देशभरात आंबा बागांचे मोठे नुकसान झाले आह़े अनेक आंबे सडून फेकण्यावर गेले होत़े त्याचा फटका बाजारपेठेत जाणवू लागला आह़े सुलतानी संकटामुळे आंबा उत्पादकांचेही मोठे आर्थिक नुकसान झाले आह़े त्यामुळे परिणामी आंब्याची आवक घटली असल्याचे सांगण्यात येत आह़े नंदुरबारात आंब्याची केवळ 25 टन इतकीच आवक होत असल्याचे व्यावसायिकांकडून सांगण्यात येत आह़़े सर्वसाधानपणे सर्वच आंबे हे दीडशे रुपये किलो प्रमाणे विकण्यात येत आहेत़ तर हापूस आंबा मात्र 300 रुपये प्रतिकिलो दराने विकला जात आह़े त्यामुळे सर्वसामान्य व्यक्ती एक किलो ऐवजी अर्धाच किलो आंब्याची खरेदी करीत असल्याचे चित्र बाजारपेठे उमटत आह़े जिल्ह्यात गुजरात व आंध्र प्रदेशातून मोठय़ा प्रमाणात आंब्याची आवक होत असत़े परंतु गारपीट झाल्याने गुजरातेतून मोठय़ा प्रमाणात आवक घटली आह़े त्यामुळे सध्या जिल्ह्यात आंध्र प्रदेशातूनच मोठी आवक होत असल्याचे व्यावसायिकांकडून सांगण्यात आले आह़े येत्या काही दिवसात जिल्ह्यातील गावरानी आंब्याची आवक वाढेल अशी शक्यता वर्तविण्यात येत आह़े
आवक घटल्याने नंदुरबारातील आंबा खातोय ‘भाव’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 12:45 PM