लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सातपुडय़ातील थंड हवेचे ठिकाण तोरणमाळकडे जाणा:या रस्त्यांवर दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढल्याने वनविभागाकडून सतर्कता बाळगत पर्यटकांना मनाई करण्यात आल्याची माहिती आह़े तोरणमाळसह परिसरात सध्या मुसळणार पाऊस सुरु असल्याने नदी नाले दुथडी भरुन वाहू लागले आहेत़ थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळला पावसाळ्यात पर्यटक मोठय़ा संख्येने हजेरी लावतात़ यंदाही पावसाची स्थिती चांगली असल्याने पर्यटक येथे गर्दी करत होत़े दरम्यान गत आठवडय़ापासून पावसाने जोर धरल्याने सातपायरी घाटात दरडी कोसळण्यास सुरुवात झाली होती़ यातून जागोजागी रस्ते बंद झाले आहेत़ यात लेंगापाणीजवळ रस्त्यावर रस्त्याचा भराव वाहून गेला आह़े काही ठिकाणी रस्ता खचल्याचेही दिसून आले आह़े यापाश्र्वभूमीवर म्हसावद पोलीस ठाणे, तालुका प्रशासन आणि वनविभागाने दक्षता घेत वाहतूक सोमवारपासून बंद केली होती़ बुधवारी स्थिती सामान्य होत असताना गुरुवारी पहाटेपासून पाऊस सुरु झाल्याने रस्त्यांवर पाणी वाहून येत आह़े यातून रस्ता खचण्याची भिती असल्याने पर्यटकांना जाण्यास मनाई करण्यात आली आह़े पावसामुळे सातपायरी घाटासह कालापाणी परिसरात कोसळलेल्या दरडी काढण्यास अडचणी येत असल्याची माहिती देण्यात आली आह़े तोरणमाळ मंडळात दरवर्षी जून महिन्यात सरासरी 427 मिलीमीटर पाऊस होतो़ त्यातुलनेत 30 जूर्नयत या भागात 131 मिलीमीटर पाऊस झाल्याची नोंद आह़े जुलैमध्ये येथे सरासरी 376 मिलीमीटर पाऊस होतो़ त्यापैकी 31 जुलैअखेर येथे 306 मिलीमीटर पाऊस झाल्याची माहिती आह़े तर ऑगस्ट महिन्यात सरासरी 499 पावसापैकी आठ ऑगस्टअखेरीस 254 मिलीमीटर पाऊस येथे कोसळला आह़े 8 ऑगस्ट रोजी मंडळात 49 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती़
मुसळधार पाऊस आणि दरडींमुळे तोरणमाळकडे जाणारे रस्ते बंदच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2019 1:04 PM