लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : दिवाळीच्या काळात आभाळाला भिडलेले भाजीपाल्याचे दर आवक वाढल्याने काहीसे घटले आह़े बाजारपेठेत नवीन भाजीपाल्याची आवक वाढल्याने या दरात घसरण झाली असल्याचे भाजीपाला विक्रेत्यांकडून सांगण्यात आल़े भाजीपाला दरात घट होण्याचे कारण काहीही असो़ मात्र यामुळे गृहिणींकडून मात्र समाधान व्यक्त करण्यात येत आह़े अवकाळी झालेल्या पावसामुळे भाजीपाल्याचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले होत़े त्यामुळे साहजिकच भाजीपाल्याची आवकही घटली होती़ त्यामुळे भाजीपाला दरात मोठी वाढ झाली होती़ मेथी, कोथंबीर, पालक आदी भाज्यांनी तर शंभरी पार केली होती़ कोथंबीर दिवाळीच्या दिवसांमध्ये 300 रुपये किलोनेदेखील विकली जात होती़ त्यामुळे साहजिकच ग्राहकांमध्ये प्रचंड नाराजी वाढली होती़ भाज्यांच्या वाढत्या दरामुळे सर्वसामान्यांचे तर चांगलेच कंबर मोडले होत़े भाजीपाला महाग त्यातच डाळींच्या दरातही वाढ झाल्याने खायचे तरी काय असा प्रश्न निर्माण झाला होता़ परंतु त्यानंतर आता बाजारपेठेत नवीन भाजीपाला येऊ लागल्याने भाज्यांच्या दरात पुन्हा घट झाली आह़े हिवाळ्याचे सुरुवात झाली असल्याने या दिवसांमध्ये मुबलक प्रमाणात भाजीपाल्याची आवक होत असत़े त्यामुळे काही दिवसांमध्ये भाजीपाल्यांच्या दरात पुन्हा घट होणार असल्याचाही अंदाज व्यक्त होत आह़े
आवक वाढल्याने भाजीपाला दरात घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2017 12:12 PM
गृहिणींमध्ये समाधान : अवकाळी पावसामुळे बसला होता मोठा फटका
ठळक मुद्देभाज्यांचे सर्वसामान्य दर.. (दर किलोत) प्लॉवर 50 रुपये किलो तसेच गिलोडी 30, दुधी भोपळा 30, गवाराच्या शेंगा 60, वांगे 40, भेंडी 40, कारले 50, पालक 40, पोकळा 40, कोथंबीर 60 ते 70, काकडी 20, लिंबू 30, शिमला मिरची 60, साधी मिरची 30, बटाटे 15, नवा कांदा 30, जु