रांझणी : तळोदा तालुक्यातील रांझणी शिवारात बिबटय़ाने केलेल्या हल्ल्यामुळे या भागात ठिकठिकाणी शेत राखण करण्यासाठी राहणारे शेतकरी आणि त्यांचे कुटूंबिय यांच्यात भिती पसरली आह़े रांझणी, रोझवा व गोपाळपूर शिवारात किमान 50 कुटूंबांचा रहिवास आह़े रोझवा आणि गोपाळपूर येथे राहणा:या प्रकल्पबाधितांना रांझणी, गोपाळपूर शिवारात जमिनी देण्यात आल्या आहेत़ हे शेतकरी घरी जाऊन परत येण्यापेक्षा शेतातच कुटूंबासह निवास करतात़ यासाठी अनेकांना शेतात छोटय़ा आकाराची झोपडीवजा घरे बनवून घेतली आह़े यासोबतच रांझणी येथील शेतक:यांच्या शेतात वर्षानूवर्षे राखणदारी करणारे आदिवासी कुटूंब राहतात़ तिन्ही गावांच्या शिवारात साधारण 50 कुटूंब रात्री शेतशिवारात मुक्कामी असतात़ मंगळवारी पहाटे रांझणी येथील ईश्वर मराठे यांच्या शेतात रखवालदारी करणारे उत्तम ठाकरे व त्यांच्या पत्नीने मारलेल्या आरोळ्यांनी हा परिसर दणाणला होता़ ठाकरे यांच्या डोक्यावर बिबटय़ाच्या दाताच्या खुणा आढळून आल्या़ त्यांच्यावर सध्या तळोदा उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत़ या हल्ल्यानंतर या भागात एकच खळबळ उडाली असून परिसरात राहणा:या कुटूंबांनी बिबटय़ा पुन्हा हल्ला करू शकतो अशी भिती व्यक्त केली आह़े बिबटय़ाकडून सहजासहजी माणसावर थेट हल्ला होत नसल्याचे वनविभागाच्या अधिका:यांनी म्हटले आह़े उत्तम ठाकरे यांच्यावर बिबटय़ाने हल्ला केल्याने या बिबटय़ाचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आह़े वनविभागाचेघटना स्थळी वनविभागाचे वनपाल एऩपी़पाटील, वनरक्षक एल टी पावरा, ज़ेआऱखोपे, एम़एस़डोळस यांनी भेट देत पंचनामा आणि पावलांचे ठसे घेतले होत़े हे ठसे बिबटय़ाचा पावलांचे असल्याचे त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आह़े
रांझणी शिवारात बिबटय़ाच्या हल्ल्याने 50 कुटूंबांमध्ये भिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 12:55 PM