लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 29 : कमी मनुष्यबळ, तोटका पगार, सुटय़ांची मारामार, सततचा ताणतणाव, वारंवार बसेस्च्या नादुरुस्तीमुळे सहन करावा लागणारा मनस्ताप यामुळे जिल्ह्यातील एसटी कर्मचारी मेटाकुटीस आले असल्याचे चित्र आह़े जिल्ह्यासह राज्याची स्थितीदेखील काही वेगळी नाही़ त्यामुळे यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्याची मागणी कर्मचा:यांकडून करण्यात येत आह़े शासकीय व निमशासकीय नोकदारांमध्ये सर्वात तणावाखाली जगणा:या कर्मचा:यांच्या यादीत महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या कर्मचा:यांचा अग्रस्थानी समावेश झाल्यास नवल नाही़ याला कारणदेखील काहीसे तसेच आह़े एसटी कर्मचा:यांना सतत तणावाचा सामना करावा लागत असल्याचे दिसून येत आह़े याला सर्वात मोठे कारण म्हणजे एसटी महामंडळाची रिक्त जागांची समस्या आह़े आहे त्या तोटक्या मनुष्यबळावर एसटी कर्मचा:यांना निभवावे लागत आह़े त्यामुळे स्वाभाविकच त्यांना मोठय़ा प्रमाणात तारेवरची कसरत करावी लागत असत़े नंदुरबार, नवापूर, अक्कलकुवा व शहादा आगारात मोठय़ा संख्येने चालक व वाहक पदाच्या जागा रिक्त आह़े त्यामुळे येथील कर्मचा:यांना काम करीत असताना तणावाचा सामना करावा लागत आह़े विशेष म्हणजे असे असूनही तोटक्या पगारातच त्यांना आपल्या घराचा गाडा हाकावा लागत आह़ेशहादा आगारात 172 चालक असून त्यात 49 जागा रिक्त आहेत तसेच 188 वाहक असून 38 जागा रिक्त आहेत़ नंदुरबार आगारात 205 चालकांपैकी तब्बल 63 जागा रिक्त आहे तर, 237 वाहकांपैकी 31 जागा रिक्त आहेत़ नवापूर आगारात एकूण 108 चालक व 125 वाहकांपैकी प्रत्येकी 45 जागा रिक्त आहेत़ अक्कलकुवा आगारात 120 चालकांपैकी 26 जागा रिक्त आहेत़ तर 125 वाहकांपैकी 25 जागा रिक्त आहेत़ कर्मचारी तणावग्रस्तरिक्त जागांमुळे एसटी कर्मचा:यांना प्रचंड तणावाचा सामना करावा लागत असल्याचे दिसून येत आह़े अनेक कर्मचारी आता सेवानिवृत्तीला आली आहेत़ त्यामुळे त्यांना वाढत्या वयामुळे तारेवरची कसरत करणे अवघड जात असत़े परिणामी या तणावग्रस्ततेचा त्यांनाही मोठय़ा प्रमाणात त्रास सहन करावा लागत असल्याचे सांगण्यात आले आह़े वाढत्या वयामुळे अनेक कर्मचा:यांना शारीरिक व्याधी जडत असतात़ त्यात कामाच्या ठिकाणीही सतत तणाव सहन करावा लागत असल्याचे याचा परिणाम कर्मचा:यांच्या आरोग्यावरही होत असल्याचे यातून दिसून येत आह़े रिक्त जागांसोबतच कर्मचा:यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असतो़ एसटी बसेसची स्थितीही खिळखिळी झाली आह़े त्यामुळे दर्जाहीन वाहने चालविताना कर्मचा:यांना मोठी कसरत करावी लागत असत़े वाहनांचा देखभाल दुरुस्ती होत नसल्याने तशाच अवस्थेत ती चालविण्याची कामगिरी बजवावी लागत असत़े त्यामुळे अनेक कर्मचा:यांना हाताचे, पायांचा पंजा, गुडघ्याचे दुखणे ओढावून घ्यावे लागले आह़े दरम्यान, रिक्त जागांमुळे इतर कर्मचा:यांवर कामाचा भार वाढत असून त्यातच, उन्हाळी सुटय़ा, यात्रोत्सव, लगAसराई आदी ‘सिझनेबल’ काळात कर्मचा:यांवर अधिकच भार निर्माण होत असतो़ त्यामुळे एसटी कर्मचा:यांना दैनंदिन काम बरोबरच इतरही उत्पन्न वाढीचे कामे करावी लागत असतात़ त्यामुळे या सर्व समस्यांकडे एसटी महामंडळाने सहानुभूतीपूर्वक विचार करणे गरजेचे आह़े
कमी मनुष्यबळामुळे कर्मचारी मेटाकुटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 12:17 PM