लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे भात लागवडीला पोषक वातावरण निर्माण होऊन लागवड क्षेत्र दुपटीने वाढले आह़े नवापुर आणि नंदुरबार तालुक्यात भात लागवडीच्या क्षेत्रात यंदा वाढ होणार असल्याचे स्पष्ट झाले आह़े जिल्ह्यात सर्वसाधारण 20 हजार 895 हेक्टर क्षेत्रात भात लागवड निर्धारित करण्यात येत़े गत दोन वर्षात ही लागवड 60 टक्क्यांपेक्षा कमीच होती़ गेल्या वर्षी दुष्काळ असल्याने भात लागवड निम्म्यावर आली होती़ यातून तांदूळ उत्पादन घसरले होत़े यंदा पावसाने जुलै महिन्यात पावसाने हजेरी लावल्यानंतर भात उत्पादक शेतक:यांना दिलासा मिळाला होता़ ऑगस्टर्पयत पाऊस टिकून असल्याने भातशेतीसाठी शेतक:यांनी तयारी पूर्ण केली असून नवापुर तालुक्यात भात लावणी वेगाने सुरु आह़े नवापुरनंतर नंदुरबार आणि अक्कलकुवा तालुक्यात भात लावणी करण्यात येत असल्याचे दिसून आले आह़े जिल्ह्यात यंदा 20 हजार हेक्टरपेक्षा अधिक भात लावणी होणार असल्याचा अंदाज असून यातून विक्रमी उत्पादन येऊन गत पाच वर्षात शेतक:यांना झालेल्या नुकसानीची भरपाई होणार असल्याचा अंदाज व्यक्त होत आह़े आजअखेरीस नंदुरबार तालुक्यात निर्धारित क्षेत्राच्या 15़19, नवापुर 79, अक्कलकुवा 70, धडगाव 85 तर तळोदा तालुक्यात 33 टक्के भात लावणी पूर्ण करण्यात आली आह़े जिल्ह्यात खरीप हंगामात तृणधान्य पिकात ज्वारी आणि भाताचा समावेश आह़े उर्वरित तृणधान्य पिके नगण्य क्षेत्रात केली जातात़ दुष्काळामुळे भाताचे लागवड क्षेत्र घटल्याने शेतक:यांच्या वार्षिक उत्पादनावर गत दोन वर्षात परिणाम झाला होता़
जिल्ह्यात आतार्पयत एकूण 15 हजार 291 हेक्टर भाताची क्षेत्रात लागवड पूर्ण करण्यात आली आह़े यात सर्वाधिक 10 हजार 963 हेक्टर भात लागवड नवापुर तालुक्यात पूर्ण झाली आह़े अद्याप तेथे लागवड सुरु असल्याने आकडा वाढणार असल्याचे सांगण्यात आले आह़े नंदुरबार 142, अक्कलकुवा 354, धडगाव, 42 तर तळोदा तालुक्यात 226 हेक्टरवर भात लागवड करण्यात आली आह़े जिल्ह्यात 2018-19 या वर्षात केवळ 10 हजार हेक्टर्पयत भात लागवड पूर्ण झाली होती़ यात नवापुर तालुक्यात पाच हजार हेक्टर्पयतच लागवड होऊ शकली होती़ यंदा मात्र नवापुर तालुक्यात पावसाने जोर दिल्याने लागवड दुपटीने वाढली आह़े नंदुरबार व अक्कलकुवा तालुक्यात यंदा भात लागवड किमान 700 ते हजार हेक्टर्पयत जाण्याची चिन्हे असल्याचे कृषीतंज्ञांकडून सांगण्यात येत आह़े
जिल्ह्यात सरासरी 1 हजार 3 हेक्टर प्रतिकिलो ग्रॅम तांदूळ उत्पादन घेतले जात़े 2015 च्या खरीप हंगामातून हेक्टरी 920 किलोग्रॅम भाताचे उत्पादन घेण्यात आल़े 173 मेट्रीक टन उत्पादन जिल्ह्याच्या वाटय़ाला आले होत़े 2016 मध्ये प्रती हेक्टर 1 हजार 162 किलो तर 294 मेट्रीक टन, 2017 च्या हंगामात प्रती हेक्टर 1 हजार 131 तर 2018 च्या खरीप हंगामात केवळ 711 किलो ग्रॅम प्रती हेक्टर उत्पादन आले आह़े गेल्या वर्षात 166 मेट्रीकटन भाताचे उत्पादन घेतले गेले होत़े