नंदुरबार : टँकरमुक्त जिल्हा अशी ओळख असलेल्या नंदुरबार जिल्हा मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या होळतर्फे हवेली शिवारात गेल्या तीन महिन्यांपासून भिषण पाणीटंचाईचा सामना करत आहेत़ नळांना पाणीच येत नसल्याने येथील महिलांनी शनिवारी हंडमोर्चा काढून रोष व्यक्त केला होता़ मोर्चेकरी महिलांनी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर उपाययोजना करण्याबाबत आश्वासन देण्यात आले असले तरी प्रत्यक्षात या रहिवासी वसाहतींचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आह़े येथील नागरिकांना भेट देऊन संवाद साधला असता, पाणीटंचाईमुळे अनेकांना शारिरिक व्याधींनाही सामोरे जावे लागत असल्याचे वास्तव त्यांनी मांडल़े क्षारयुक्त पाण्यामुळे महिला आणि बालिकांना त्वचारोगांसह नागरिकांना जलजन्य आजारांची बाधा झाल्याचे सांगण्यात आल़े होळ शिवारातील गुरुकुल नगर 1, गुरुकुल नगर 2, जगतापवाडी, गंधर्व नगरी यासह चार ते पाच कॉलन्यांमध्ये तब्बल 3 हजाराच्या जवळपास नागरिकांचा रहिवास आह़े ग्रामपंचायत हद्दीत तयार करण्यात आलेल्या या वसाहतींमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या ही सर्वाधिक मोठी आह़े गुरुकुल नगर 1 आणि 2 येथे तीन महिन्यांपासून पाणीच नसल्याने नागरिक दर चार ते पाच दिवसांनी टँकर मागवून स्वत:ची गरज भागवत आहेत़ जिल्हा टँकरमुक्त असताना याठिकाणी मात्र दिवसभर पाण्याचे टँकर्स नागरिकांच्या घरात पाणी टाकत असल्याचे चित्र सर्रास नजरेस पडत़े होळ ग्रामपंचायतीच्या अखत्यारित असलेल्या दोन्ही ठिकाणी पाण्याचा बोअर करून देण्यात आला आह़े परंतु तीन महिन्यांपासून हे बोअर कोरडे होऊनही पाणीटंचाईबाबत उपाययोजना केल्या गेलेल्या नाहीत़ पावसाळा सुरू होऊन पाणीटंचाई ‘जैसे थे’ असल्याने नागरिक हैराण झाले असून पाणीटंचाई तत्काळ दूर करण्याच्या मागणीसाठी अधिका:यांच्या दालनांचे उंबरे ङिाजवले जात आहेत़
होळ शिवारात पावसाळ्यात टंचाई : क्षारयुक्त पाण्याच्या वापराने त्वचारोग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2018 5:01 PM