लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शुक्रवारी भाजीपाला व्यापा:यांनी कडकडीत बंद पाळला. सकाळी व सायंकाळी बाजार समितीत भाजीपाल्याचा लिलावही होऊ शकला नाही. बाजारात देखील भाजीपाला व्यापारी दिसून आले नाहीत. यामुळे लाखो रुपयांची उलाढाला ठप्प झाली होती. यामुळे गृहिणींची अडचण झाली तर मोठय़ा हॉटेल व्यावसायिकांनाही समस्येला सामोरे जावे लागले.दि. नंदुरबार व्हेजीटेबल कमिशन एजंट असोसिशएन, महात्मा फुले भाजीपाला मार्केट यार्डचे माजी अध्यक्ष व माळी समाजाचे अध्यक्ष नगरसेवक आनंद माळी यांच्यावरील झालेल्या जिवघेण्या हल्ल्याच्या निषेधार्थ व्हेजीटेबल असोसिएशनसह इतर संघटनांतर्फे शुक्रवारी बंदचे आयोजन करण्यात आले होते. दोन दिवसांपूर्वीच असोसिएशनतर्फे बाजार समिती सभापतींना बंदबाबत निवेदन देण्यात आले होते. बाजार समितीत दोन वेळा लिलाव होतात. शुक्रवारी दोन्ही वेळचे लिलाव होऊ शकले नाहीत. बाजार समितीच्या भाजीपाला यार्डमध्ये दिवसभर शुकशुकाट होता. एकही वाहन भाजीपाला घेवून आले नाही किंवा बाहेर गेले नाही. यामुळे बाजार समितीचे लाखोंचे नुकसान झाले. मंगळ बाजार आणि इतर ठिकाणी भरणारा भाजीपाला बाजार देखील दिवसभर बंद होता. यामुळे मंगळ बाजारात देखील शुकशुकाट दिसून आला. अनेक जणांना सकाळी बंदची माहिती नसल्यामुळे त्यांना आल्या पावली परत जावे लागले. नेहमीच गजबजलेला मंगळ बाजारातील शुकशुकाट दिवसभर कायम होता.सकाळी बाहेरगावहून येणा:या किरकोळ भाजीपाला विक्रेत्या महिलांनाही बंदची कल्पना आल्यानंतर परत जावे लागले.गृहिणींची अडचणभाजीपाल मार्केट संपुर्णपणे बंद असल्यामुळे गृहिणींना अडचणींचा सामना करावा लागला. सकाळी अनेक गृहिणी बाजारात नेहमीप्रमाणे भाजीपाला खरेदीसाठी आल्या. परंतु बंदची कल्पना आल्यानंतर त्यांना माघारी फिरावे लागले. हॉटेल व्यावसायिकांची अडचणया बंदमुळे हॉटेल व्यावसायिकांनाही मोठय़ा समस्येला सामोरे जावे लागले. शाकाहारी हॉटेलमध्ये भाजीपाला मोठय़ा प्रमाणावर खरेदी केला जातो. त्यापासून विविध डिश तयार केल्या जातात. परंतु आजच्या बंदमुळे अनेक हॉटेल व्यावसायिकांना साध्या आणि कायमच्या डिश ग्राहकांना द्याव्या लागल्या. परिणामी हॉटेल व्यवसायावरही मोठा परिणाम दिसून आला. दरम्यान, बंद यशस्वी झाल्याचा दावा दि.नंदुरबार व्हेजीटेबल कमिशन एजन्ट असोसिएशनतर्फे करण्यात आला. या बंदमध्ये कमिशन एजंट, व्यापारी, शेतकरी, छत्रपती शिवाजी महाराज मार्केट मंगळ बाजार, पंडित नेहरू हातलॉरी संघटना नेहरु पुतळा यांनी पाठींबा देवून बंदला सहकार्य केल्याचे असोसिएशनतर्फे अध्यक्ष विजय माळी, उपाध्यक्ष रावसाहेब माळी, सचिव नरेंद्र माळी, कार्याध्यक्ष प्रवीण माळी यांच्यातर्फे सांगण्यात आले.
नंदुरबारात बंदमुळे भाजीपाला खरेदी-विक्री झाली ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2019 8:56 PM