शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या
5
अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर पुन्हा एकदा प्रेमात पडली मलायका?, मिस्ट्री मॅनसोबतचा व्हिडीओ व्हायरल
6
'बंडखोरी' रोखण्यासाठी ममता बॅनर्जींनी आपली पकड घट्ट केली; प्रत्येक नेत्याच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या
7
Stock Market Highlights: सेन्सेक्स-निफ्टीची फ्लॅट सुरुवात, मिडकॅप इंडेक्समध्ये खरेदी; Adani Ports टॉप लूझर
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी
9
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
10
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
11
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
12
तरुणाचा खून, ॲसिड टाकून मृतदेह फेकला; अखेर 'असा' झाला हत्या प्रकरणाचा उलगडा 
13
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
14
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
16
व्यवसाय, बंगला अन् २० एकर फार्महाऊस; मुलीनं दिली जाहिरात 'अस्सा नवरा हवा'
17
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
18
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
19
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
20
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज

संपामुळे ठिकठिकाणी कचºयाचे ढिग पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2020 1:06 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सफाई ठेकेदाराकडील रोजंदारी सफाई कर्मचाऱ्यांचा संप सलग चौथ्या दिवशीही सुरूच राहिल्याने शहरातील विविध भागात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सफाई ठेकेदाराकडील रोजंदारी सफाई कर्मचाऱ्यांचा संप सलग चौथ्या दिवशीही सुरूच राहिल्याने शहरातील विविध भागात कचºयाचे ढिग साचले आहे. घरोघरी कचरा संकलन देखील होत नसल्यामुळे नागरिकांना गोळा केलेला कचरा जाळावा लागत आहे. दुसरीकडे बायोवेस्टेज संकलनासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. दरम्यान, कर्मचाऱ्यांनी तीनशे ते साडेतीनशे रुपये रोज मिळावा या मागणीवर ठाम आहेत.नंदुरबार पालिकेने सफाईचा ठेका दिलेल्या सेवा फाऊंडेशनकडील रोजंदारीवर असलेल्या दिडशे सफाई कर्मचाºयांनी पगारवाढ मिळावी यासाठी कामबंद आंदोलन पुकारले आहे. आंदोलनाचा रविवारी चौथा दिवस होता. पालिकेच्या नियमित असलेल्या १४० कर्मचाºयांवर शहरातील कचरा उचलण्याची कसरत सुरू असली तरी पुर्ण होत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे शहरात कचºयाची समस्या निर्माण झाली आहे. आधीच कोरोनाची भिती त्यात कचरा आणि दुर्गंधीची समस्या यामुळे शहरवासी भितीच्या वातावरणात वावरत आहेत.दररोज २० टन कचरापालिकेतर्फे सफाई ठेकेदाराच्या माध्यमातून दररोज किमान २० टन कचरा उचलला जातो. साधारणत: २० लहान गाड्या, ट्रॅक्टरच्या माध्यमातून हा कचरा संकलीत करून तो पालिकेच्या डंपींग ग्राऊंडमध्ये टाकला जातो. सध्या कर्मचाºयांच्या संपामुळे यातील ३० ते ४० टक्के कचराच संकलीत होत आहे. त्यामुळे विविध ठिकाणी कचºयाचे ढिग लागले आहेत.घरोघरी संकलनही नाहीकचºयाचे घरोघरी संकलन करण्यासाठी किमान २५ वाहने दररोज सकाळी साडेसहा वाजता निघतात. दुपारी ११ ते १२ वाजेपर्यंत सर्व वसाहतींमधील कचरा संकलीत करून तो डंपींग ग्राऊंडमध्ये टाकला जातो. कचरा संकलीत करतांना ओला व सुका कचरा गोळा केला जातो. तो कचरा संकलीत करणाºया वाहनात वेगवेगळा टाकला जातो. यासाठी एका वाहनावर चालक व दोन कर्मचारी अशा दोन किंवा तीन जणांची नियुक्ती असते. त्या त्या भागात फिरून हा कचरा संकलीत केला जातो.चार दिवसांपासून कचरा संकलीत करणारे वाहनच येत नसल्यामुळे घरात कचरा गोळा करून डस्टबीन देखील ओव्हरफ्लो झाल्या आहेत. त्यामुळे अनेक कुटूंबांनी आता आपल्या घराजवळील मोकळ्या जागेत कचरा जाळून तो नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. रविवारी अनेक ठिकाणी असे चित्र दिसून आले. ओला कचºयाची विल्हेवाट लावण्यासाठी मात्र अनेक कुटूंबांची कसरत होत असल्याचे दिसून येत आहे.आजारांची भितीरस्ते आणि चौकातील कचरा पुर्णपणे उचलला जात नाही आणि घरोघरी कचरा संकलनही होत नसल्यामुळे कचºयाची दुर्गंधी आणि त्यापासून आजारांची भिती व्यक्त केली जात आहे. आधीच कोरोनामुळे नागरिक भितीच्या वातावरणात वावरत असतांना आता ही समस्या येऊन उभी राहिल्याने नागरिकांच्या मनात धडकी भरली आहे.पगारवाढ किती...ठेकेदाराकडील रोजंदारी असलेल्या १५० कर्मचाºयांना किमान ३०० ते ३५० रुपये रोज मिळावा अशी मागणी आहे. तर ठेकेदार कंपनी आता आहे त्या पगारात २५ ते ३० रुपये वाढ करून देण्याच्या तयारीत आहेत. त्यावर कर्मचारी राजी नसल्याने तिढा सुटत नसल्याचे दिसून येत आहे. चार ते सहा तासाच्या ड्यूटीसाठी कर्मचाºयांना ३०० ते ३५० रुपये रोज देणे कंपनीला परवडणारे नसल्याचे कंपनीचे म्हणने आहे. त्यामुळे आता पालिकेनेच मध्यस्थी करून हा तिढा सोडवावा अशी मागणी कंपनीने केली आहे.ठेकेदाराकडील सफाई रोजंदारी कर्मचाºयांचा प्रश्न उभा ठाकला आहे. पालिकेचे १४० सफाई कर्मचारी नियमित कामावर आहेत. पालिकेने ठेकेदाराला नोटीसही बजावली आहे. सोमवारी घरोघरी कचरा संकलनाचे काम सुरू होणार आहे. कुणी कामाला आडकाठी आणत असेल तर ठेकेदाराला पोलीस संरक्षण घेता येईल. ठेकेदार समन्वयाने तोडगा काढून काम सुरू करेल. नागरिकांना होणाºया त्रासाची कल्पना आहे. परंतु तोडगा निघेपर्यंत नागरिकांनीही सहकार्य करणे अपेक्षीत आहे.-रत्ना चंद्रकांत रघुवंशी,नगराध्यक्षा, नंदुरबार.