लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात 33 कोटी वृक्ष लागवड उपक्रमांतर्गत 90 लाखांपेक्षा अधिक रोपांची लागवड करण्यात येणार आह़े यासाठी 94 लाख खड्डे खोदून तयार झाले असून 1 जुलैपासून जिल्ह्यात होणा:या वनमहोत्सव व वृक्षारोपणासाठी प्रशासनाकडूनही जय्यत तयारी सुरु आह़े राज्य शासनाच्या 50 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत यंदा राज्यात 33 कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. नंदुरबार जिल्ह्याला 91 लाख 44 हजार वृक्ष लागवड करण्याचे उद्दीष्ट देण्यात आले होत़े परंतू प्रशासनाने वाढीव उद्दीष्टय़ स्विकारत 94 लाख 58 हजार रोपे लावण्याचे नियोजन केले आह़े जिल्ह्यात एकूण 6 हजार 600 ठिकाणी वृक्ष लागवड होणार असल्याची माहिती देण्यात आली आह़े 1 जुलैपासून सुरु होणा:या वृक्षारोपण मोहिमेसाठी आतार्पयत 94 लाख 14 हजार खड्डे खोदून तयार ठेवण्यात आल्याने यंदा वृक्षारोपणाचे उद्दीष्टय़ पूर्ण होणार आह़े वृक्षलागवड मोहिमेसाठी वन विभाग आणि सामाजिक वनीकरण विभागातर्फे तयारीला वेग देण्यात येत असून विविध विभागांना रोपे उपलब्ध करून देण्यात येत आहेत. वन विभाग 47 लाख तर सामाजिक वनीकरण विभाग सुमारे 23 लाख रोपांची लागवड करणार आहे. कृषी विभाग 2 लाख 92 हजार तर ग्रामपंचायतस्तरावर 18 लाख 50 हजार रोपांची लागवड करण्यात येणार आहे. यंदाही प्रशासनाने फळझाडांसह इतर देशी वृक्ष प्रजातींची नियोजित जागांवर लागवड करण्याचे आदेश काढले आहेत़ वृक्षारोपणाचा हा कार्यक्रम तब्बल तीन महिने सुरू राहणार असून नियोजनाच्यादृष्टीने तालुकास्तरावर समन्वयक अधिका:यांची नियुक्ती केली गेली आह़े
नंदुरबार दरम्यान वृक्ष लागवडीच्या कामांची पडताळणी करण्यासाठी वृक्ष लागवडीच्या प्रत्येक स्थळाचे जीओटॅगींग करण्यात येत आह़े ही माहिती वन विभागाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आली आह़े यामुळे वृक्षारोपणाची स्थिती समजून येऊन पारदर्शक कामकाज होणार आह़े यंदा झाडांच्या संगोपनाला अधिक बळकटी देण्यासाठी वनविभागाच्या प्रयत्नातून जिल्ह्यातील मुख्य नद्या व उपनद्यांच्या किना:यावर 137 क्षेत्रात वृक्षारोपण केले जाणार आह़े यामुळे या झाडांची स्थिती मजबूत राहून त्यांची वाढ लवकर होणार असल्याचे गृहित धरण्यात येत आह़े वनविभाग, सामाजिक वनीकरण आणि कृषी विभागाच्या एकूण 159 रोपवाटिकांद्वारे आवश्यक ती रोपे तयार करण्यात येत असल्याचे चित्र आह़े