लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : राष्टÑीय कृषी बाजार अर्थात ई-नाम योजनेच्या अंमबलजावणीच्या आढाव्यासंदर्भात तसेच त्यातील तपशीलांची माहिती व्हावी यासाठी नंदुरबार बाजार समितीत नुकतीच प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. पुणे येथील तज्ज्ञांची यावेळी मार्गदर्शन केले.सध्या राष्टÑीय कृषी बाजार योजनेची अंमलबजावणी करण्याचे धोरण राज्य व केंद्र शासनाचे आहे. देशभरातील बाजारांमधील कृषी मालाचे भाव स्थानिक स्तरावर समजावे. त्यानुसार स्थानिक ठिकाणी शेतकऱ्यांना भाव मिळावा यासह इतर उद्देशाने राष्टÑीय कृषी बाजार अर्थात ई-नाम योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेत पहिल्या टप्प्यात नंदुरबार बाजार समितीचा देखील समावेश करण्यात आला आहे. परंतु ही योजना अद्यापही शेतकरी, व्यापारी, आडते, बाजार समिती संचालक मंडळ यांच्या अंगणवळणी पडली नाही. त्यामुळे संबधीत विभागाने ठिकठिकाणी प्रशिक्षण कार्यशाळा घेण्याचे ठरविले आहे. यानुसार नंदुरबारात ही कार्यशाळा घेण्यात आली.पुणे येथील माहिती व प्रशिक्षण तज्ज्ञ सौरभ नवघरे यांनी या संदर्भात विविध बाबींची माहिती दिली. व्यापारी व शेतकºयांच्या दृष्टीने ही योजना कशी फायदेशीर आहे. त्याची अंमलबजाणी कशी केली जावे याची माहिती दिली. शिवाय तांत्रिक मुद्दयांवर देखील त्यांनी भर दिला.व्यापारी व शेतकºयांच्या विविध प्रश्नांवर देखील त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली.प्रास्ताविकात बाजार समितीचे सचिव योगेश अमृतकर यांनी या प्रशिक्षण कार्यशाळेचा उद्देशा संदर्भात माहिती दिली. प्रशिक्षणास अॅड.राम रघुवंशी, बाजार समितीचे सभापती किशोर पाटील, शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष बी.के.पाटील, उपसभापती संभाजी वसावे, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष किशोरभाई वाणी, संचालक डॉ.सयाजी मोरे, देवमन पवार, अंकुश पाटील, दिनेश पाटील, नवीन बिर्ला, भरत पाटील, अशोक आरडे, बापू पाटील यांच्यासह शेतकरी, आडते, व्यापारी व बाजार समिती कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ई-नाम प्रणाली शेतकऱ्यांच्या हिताची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2019 12:14 PM