लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : वनजमिन बळकावण्याच्या हेतूने जमिन खेडणा:या शेतक:यास मारहाण करणा:या चौघांना शहादा न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा सुनावली़ शहादा तालुक्यातील कोळपांढरी येथे डिसेंबर 2014 मध्ये मारहाणीची घटना घडली होती़ भिमसिंग पद्मा पावरा यांच्या फिर्यादीवरुन धनगर फिरंग्या पावरा, रमेश धनगर पावरा, कमलसिंग धनगर पावरा, पंडीत धनगर पावरा या चौघांविरोधात शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता़ शहादा न्यायालयात पोलीस हेड कॉन्स्टेबल मनोज कोळी यांनी दोषारोपपत्र दाखल केले होत़े प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए़आऱकल्हापुरे यांच्या न्यायालयात झालेल्या सुनावणीत धनगर पावरासह तिघे दोषी आढळल्याने त्यांना दोन वर्ष कारावास आणि 1 हजार रुपयांचा दंडाची शिक्षा देण्यात आली़ सरकार पक्षातर्फे अॅड़ संजय चौधरी यांनी तर पैरवी अधिकारी म्हणून पोलीस नाईक अतिक सय्यद यांनी काम पाहिल़े
वनजमिनीच्या वादातून मारहाण करणा:यांना शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2019 11:52 AM