लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अक्कलकुवा येथील बस आगारात इंधन बचत मोहिमेचे उद्घाटन करण्यात आल़े 16 जोनवारी ते 15 फेब्रुवारी दरम्यान ही मोहिम राबविण्यात येत आह़े मोहिमेचे उदघाटन तहसीलदार नितीनकुमार देवरे यांच्या हस्ते करण्यात आल़ेया वेळी आगार व्यवस्थापक अनुजा दुसाने, सहाय्यक वाहतूक निरीक्षक एस़एस़ पाडवी, आगार लेखागार मिलिंद परदेशी आदी उपस्थित होत़े यावेळी मार्गदर्शन करताना तहसीलदार देवरे म्हणाले की, इंधनाची बचत करणे आता काळाची गरज आह़े चालकांनी गरज असेल तेवढाच वाहनाचा वापर करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितल़े अनेक वेळा चालक आपले वाहन एका ठिकाणी उभे असतानाही ते सुरुच ठेवत असतात़ त्यामुळे इंधनाची नासाडी होत असल्याचेही त्यांनी सांगितल़े आगार व्यवस्थापन अनुजा दुसाने यांनी सांगितले की, 90 टक्के इंधनाची बचत ही चालकांच्या हातात असत़े विनाकारण वाहन सुरु ठेवणे चालकांनी टाळले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली़ यातून महामंडळाचा डिङोलचा खर्चही कमी होणार असल्याचे त्यांनी सांगितल़े चालकांनी बस ही आपले वाहन आहे असे समजून चालवायला हवे असे आवाहनदेखील त्यांनी केल़े या वेळी मोठय़ा संख्येने चालक, वाहक उपस्थित होत़े
इंधन बचतीसाठी प्रयत्न आवश्यक : अक्कलकुवा येथे इंधन बचत मोहिम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 12:58 PM