नंदुरबार : जिल्हा परिषदेच्या समग्र शिक्षा अभियानांतर्गत जिल्ह्यातील स्थलांतरीत मजुरांच्या पाल्यांचे सव्रेक्षण करण्यात आल़े यात, एकूण 705 विद्याथ्र्याचे व त्यांच्या पालकांचे उद्बोधन करुन त्यांना स्थलांतरीत होण्यापासून रोखण्यात आले आह़े तर, एकूण 1 हजार 577 स्थलांतरीत होऊन गेलेल्या विद्याथ्र्याना शिक्षण हमी कार्ड (ईजीएस) देण्यात आल़ेसध्या जिल्ह्यात सर्वत्र साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरु झाला आह़े त्यामुळे हजारो स्थानिक मजुरांचे परजिल्ह्यात तसेच राज्याबाहेरही स्थलांतर होत असत़े तसेच बहुतेक परराज्यातील व बाहेरच्या जिल्ह्यातील मजूर स्थलांतरीत होऊन जिल्ह्यात येत असतात़ रोजगाराच्या शोधात होणा:या स्थलांतरामुळे संबंधित मजुरांच्या पाल्यांनाही गावोगावी फिरावे लागत असत़े त्यामुळे त्यांचा शिक्षणाचा मुद्दा गंभीर होत असतो़ त्यामुळे शिक्षण विभागाकडून अशा विद्याथ्र्याचे सव्रेक्षण करण्यासाठी अभियान राबविण्यात आले होत़े याचा अहवाल नुकताच आला आह़े तो पुढील प्रमाणे, सव्रेक्षणात एकूण 71 विद्यार्थी शाळाबाह्य म्हणून आढळून आलेली आहेत़ शहादा तालुक्यात 7, अक्कलकुवा 16 तर धडगाव तालुक्यात 48 विद्याथ्र्याचा समावेश आह़े तसेच संभाव्य स्थलांतरीत होणा:या विद्याथ्र्याचीसंख्या 3 हजार 334 इतकी आह़े यात, नंदुरबार 1 हजार 500, नवापूर 11, शहादा 1 हजार 589, तळोदा 45, अक्कलकुवा 31, धडगाव 158 अशी आह़े तसेच 705 विद्याथ्र्याना स्थलांतरापासून थांबवण्यात आले आह़े यात, नंदुरबार 174, नवापूर 30, शहादा 115, तळोदा 171, अक्कलकुवा 105, धडगाव 110 विद्याथ्र्याचा समावेश आह़े एकूण 1 हजार 577 स्थलांतरीत होऊन गेलेल्या विद्याथ्र्याना शिक्षण हमी कार्ड ‘ईजीएस’ देण्यात आल़े यात, नंदुरबार 817, शहादा 585, तळोदा 69, धडगाव 106 विद्याथ्र्याचा समावेश आह़े परजिल्ह्यातून स्थलांतर होऊन नंदुरबारात आलेल्या विद्याथ्र्याची संख्या हाती आली नसून अद्याप नवापूर तालुक्यातच केवळ 10 बालके आढळून आलेली आहेत़ तसेच सरल प्रणालीमध्ये एकूण 983 बालकांची नोंद करण्यात आली आह़े यात, नंदुरबार 197, शहादा 585, तळोदा 69, अक्कलकुवा 26, धडगाव 106 अशी विद्यार्थी संख्या आह़े दरवर्षी मोठय़ा संख्येने जिल्ह्याबाहेर मजुरांचे स्थलांतर होत असत़े त्यामुळे अशा परिस्थितीत विद्याथ्र्याचे मोठे शैक्षणिक नुकसान होत असत़े स्थानिक ठिकाणी हाताला काम मिळत नसल्याने साहजिकच जेथे रोजगार उपलब्ध होईल अशा ठिकाणी मजुरांचे स्थलांतर होत असत़े स्थलांतरामुळे संपूर्ण कुटुंब हंगामी स्वरुपात स्थलांतरीत होत असत़े त्यामुळे मजुरांच्या पाल्यांचे शिक्षण अर्धवट राहण्याचा धोका निर्माण होत असतो़ याचा सारासार विचार करुन शिक्षण विभागाकडून ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात मजुरांच्या पाल्यांचे स्थलांतर होत असत़े त्यामुळे असे स्थलांतर रोखण्यासाठी विद्यार्थी व पालकांचे उद्बोधन करण्यात येत असत़े
दीड हजार विद्याथ्र्याना ‘ईजीएस’चे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 12:46 PM