n लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : मुदत संपलेल्या जिल्ह्यातील तब्बल ८७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी १५ डिसेंबरपासून उडणार आहे. अनेक मोठ्या ग्रामपंचायतींचा यात समावेश आहे. या वर्षात जिल्हा परिषद निवडणुकीनंतर प्रथमच राजकीय धुराळा उडणार आहे. कोरोना आणि लॅाकडाऊन यामुळे गेल्या आठ ते नऊ महिन्यापासून कुठल्याही निवडणुका झाल्या नाहीत. त्यामुळे राजकीय पटलावर शांतता होती. आता मात्र ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून राजकीय धुराळा उडणार आहे. सर्वच तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुका होणार आहेत. त्यामुळे राजकीय कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. शिवाय अनेकांनी निवडणुकीसाठी फिल्डींग देखील लावण्यास सुरुवात केली आहे. मुदत संपलेल्या व येत्या काळात मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केली आहे. त्यानुसार १५ डिसेंबरपासून निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होत आहे. शहादा तालुक्यातील सर्वाधिक २७ तर नंदुरबार तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींचा त्यात समावेश आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुका या स्थानिक प्रश्नावर लढविल्या जात असल्या तरी कुठल्या गटाकडे, पक्षाकडे किती ग्रामपंचायती आहेत यावरून त्या भागातील आमदार, लोकप्रतिनिधी यांचे राजकीय वलय ठरत असते. त्यामुळे स्थानिक आमदार व पक्षाकडून अशा ग्रामपंचायतींमध्ये रसद पुरविली जाते. त्यामुळे अशा निवडणुका चुरशीच्या होतात. जिल्ह्यातील राजकीय स्थिती पहाता आघाडी व भाजप असा सामना होण्याची शक्यता असली तरी आघाडीतील तिन्ही पक्षांची तोंडे वेगवेगळ्या दिशेला असल्यामुळे निवडणुकीत आघाडी न राहता पॅनेलप्रमाणेच निवडणुका होणार असल्याचे चित्र आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार विधानसभा मतदारसंघाची २५ सप्टेंबर रोजी अस्तित्वात असलेली मतदार यादी या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यानुसार तयार करण्यात आलेल्या ग्रामपंचायतींच्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या १ डिसेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. त्यावर हरकती व सूचना दाखल करण्यासाठी ७ डिसेंबर पर्यंतची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार अंतिम मतदार याद्या १४ डिसेंबर रोजी प्रसिध्द केल्या जाणार आहेत. नामनिर्देशनपत्रे २३ ते ३० डिसेंबर या कालावधीत स्वीकारली जातील. शासकीय सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार नाहीत. त्यांची छाननी ३१ डिसेंबर रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे ४ जानेवारी पर्यंत मागे घेता येतील व त्याच दिवशी निवडणूक चिन्ह वाटप होईल. मतदान १५ जानेवारी २०२१ रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत होईल. मतमोजणी १८ जानेवारी रोजी होईल. गडचिरोली जिल्ह्यात फक्त मतदानाची वेळ सकाळी साडेसात ते दुपारी तीन वाजेपर्यंत असेल
निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायती व सदस्य संख्याn शहादा तालुका : असलोद (११), न्यू असलोद (७), राणीपूर (९), नागझिरी (९), कोटबांधणी (९), टेंभे तर्फे शहादा (७), टेंभे तर्फे सारंगखेडा (९), डामरखेडा (९), तोरखेडा (११), दोंदवाडे (७), नांदरखेडा (९), पुसनद (९), फेस (९), बामखेडा (७), बामखेडा तर्फे त-हाडी (११), मनरद (९), मोहिदे तर्फे शहादा (१५), वर्ढे तर्फे शहादा (७), शेल्टी (९), सारंगखेडा (१७), सोनवद तर्फे शहादा (९), हिंगणी (७), कानडीतर्फे शहादा (७), कौठळ तर्फे सारंगखेडा (७), कुकावल (९), कोठली तर्फे सारंगखेडा (९), कु-हावद (७)n नंदुरबार तालुका : वैंदाणे (९), तलवाडे खुर्द (११), भादवड (९), कोपर्ली (१३) कंढ्रे (७), कार्ली (११), भालेर (१३), हाटमोहिदा (९), खोंडामळी (१३), खर्देखुर्द (९), शनिमांडळ (९), खोक्राळे (९), मांजरे (९), निंभेल (७), नगाव (७), काकर्दे (७), विखरण (९), बलदाणे (७), सिंदगव्हाण (९), तिलाली (९), न्याहली (७), आराळे (७), n तळोद तालुका : बंधारा (९), पाडळपूर (९), राणीपूर (९), रेवानगर (९), सरदारनगर (७), नर्मदानगर (९), रोझवा पुनर्वसन (९)n धडगाव तालुका : धनाजे बुद्रूक (९), भोगवाडे खुर्द (९), उमराणी बुद्रूक (९), घाटली (१५), खामला (९), काकर्दा (११), आचपा (९), मुंदलवड (९), मनवानी बुद्रूक (९), खर्डा (९), सिसा (११), काकरपाटी (९), पाडली (९), वरखेडी बुद्रूक (९), कुंडल (९) हातधुई (७)n नवापूर तालुका : धनराट (९), धुळीपाडा (७), वडकळंबी (७), उकळापाणी (९), रायंगण (९), कोठडा (७), नांदवण (७), उमराण (१३), चेडापाडा (७), बंधारपाडा (११), केळी (९), ढोंग (९), पळसून (७), सागाळी (९)n अक्कलकुवा तालकुा : देवमोगरा (९)