लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : तालुक्यातील 20 ग्रामपंचायतींच्या 24 रिक्त पदांसाठी पोटनिवडणूक कार्यक्रमास सुरूवात झाली आह़े शनिवारी अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिवस असल्याने शुक्रवारी शहादा तहसील परिसर गजबजला होता़ तालुक्यातील धांद्रे बुद्रुक, पाडळदा ब्रुद्रुक, कमरावद, बिलाडी तर्फे सारंगखेडा, बुपकरी, श्रीखेड, भोरटेक, दामळदा, मलोणी, कुढावद, सावळदा, कु:हावद तर्फे सारंगखेडा, कळंबू, ओझर्टा, परिवर्धे, बुडीगव्हाण, अलखेड, काकर्दे दिगर, मंदाणे व कानडी तर्फे हवेली या 20 गावांमध्ये 24 ग्रामपंचायत सदस्यांची पदे रिक्त असल्याने निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यात आली आह़े गत निवडणूकीत नामनिर्देशन दाखल न झाल्याने, सदस्यांनी राजीनामा दिल्याने तसेच एक सदस्य मयत झाल्याने ही पदे रिक्त झाली होती़ शुक्रवार सायंकाळर्पयत मंदाणा, कळंबू आणि कानडी तर्फे हवेली या तीन ग्रामपंचायतींसाठी तीनच अर्ज दाखल झाले होत़े शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजेर्पयत अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आह़े सोमवारी 12 फेब्रुवारी दाखल झालेल्या अर्जाची छाननी करण्यात येऊन 15 फेब्रुवारीर्पयत उमेदवारांना अर्ज माघारी घेत येणार आहेत़ या 20 ग्रामपंचायतींसाठी 25 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून 26 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार असल्याची माहिती देण्यात आली आह़े या निवडणूकांसाठी मंडळ अधिकारी एस़ जी़परदेशी, आऱएऩशिंपी, प्रशांत देवरे, जी़बी़धाकड, एस़जी़ वाडेकर, पी़टी़गिरासे, एस़जी़ शिरसाठ, बी़ओ़पाटील यांची नियुक्त करण्यात आली आह़े
20 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू : शहादा तालुका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 12:32 PM