शहरं
Join us  
Trending Stories
1
“लोकांची भावना तुतारीकडे…”; भाजपच्या सुरेश धस यांचं वक्तव्य: अजित पवारांवर साधला निशाणा!
2
दोन्ही उपमुख्यमंत्री निवडणूक रिंगणात; विठ्ठलाच्या महापूजेचा मान कोणाला मिळू शकतो? जाणून घ्या
3
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या प्रचार सभांचा धडाका; 'या' दिवशी पहिली सभा कोल्हापुरात
4
फक्त २ 'परदेशी'; पंत, KL राहुल अन् श्रेयससह लिलावात सर्वाधिक मूळ किंमतीसह नाव नोंदणी करणारे खेळाडू
5
'स्विंग स्टेट्स' ठरवणार अमेरिकेचा नवा राष्ट्राध्यक्ष! ट्रम्प २० राज्यांत; कमला १० राज्यांत विजयी
6
'या' शेअरचं ट्रेडिंग बंद; कंपनीवर आहे प्रचंड कर्ज; ₹३४८ वरून ₹३४ वर आली किंमत
7
गोकुळचे माजी अध्यक्ष रवींद्र आपटे यांचे निधन; आज होणार अंत्यसंस्कार
8
अखेरची निवडणूक असल्याने माझा सन्मान राखावा; शहाजीबापू पाटलांचं जनतेला भावनिक आवाहन 
9
अल्लू अर्जुन आणि फहाद फासिल भिडणार! नवीन पोस्टर पाहून अंगावर येईल काटा
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: मुंबईत आज इंडिया आघाडीची पहिली सभा; राहुल गांधी संबोधित करणार
11
भाजपकडून बंडखोरांवर मोठी कारवाई, राज्यातील ४० नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
12
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
13
कोण होणार अमेरिकेचा अध्यक्ष ट्रम्प की हॅरिस? 40 वर्षांत ज्यांची भविष्यवाणी कधी खोटी ठरली नाही त्यांनी सांगितलं
14
US Election Share Market : ट्रम्प यांच्या पुन्हा सत्तेत येण्याचे संकेत, भारतीय शेअर बाजारात तेजी; निफ्टी २४,३०० च्या वर
15
इस्रायलचा गाझामध्ये पुन्हा मोठा हल्ला! एअरस्ट्राइकमध्ये महिला-मुलांसह ३० जणांचा मृत्यू
16
सरकार 'या' कंपनीतील २.५ टक्के हिस्सा विकणार; ५०५ रुपये प्रति शेअर किंमत झाली निश्चित, जाणून घ्या
17
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
18
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
19
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ
20
'मिरज पॅटर्न' चौथ्यांदा चालेल? भाजपाच्या सुरेश खाडे यांच्यासमोर महाविकास आघाडीचे आव्हान, तानाजी सातपुते यांच्याशी लढत

नंदुरबारात फक्त दोनच ठिकाणी वीज अटकाव केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2018 12:37 PM

वीज अटकाव मनोरे : दुर्गम भागात अधिक घटना, वीज पडून मृतांची संख्या दरवर्षी वाढतेय

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : आकाशातील नैसर्गिक वीज अटकविण्यासाठी असलेली यंत्रणा जिल्ह्यात पुरेशी नाही. यापूर्वी करण्यात आलेल्या सव्र्हेत सात ठिकाणे निश्चित करण्यात आली होती. पैकी दोनच ठिकाणी वीज अटकाव मनोरे बसविले. पूर्वीची दोन आहेत. अधिकृतरित्या केवळ चारच ठिकाणी असे मनोरे उभारण्यात आलेले आहेत. त्यांची संख्या आणखी वाढविणे अपेक्षित आहे. विशेषत: दुर्गम भागात ते गरजेचे असल्याचे चित्र गेल्या काही वर्षातील घटनांवरून स्पष्ट होते.नैसर्गिक आपत्तीच्या घटनांमध्ये पावसाळ्यात वीज पडून जीवित व वित्तहानी होण्याच्या घटना मोठय़ा प्रमाणावर घडतात. त्यामुळे आकाशातील विजेला अटकाव करण्यासाठी तांत्रिकदृष्टय़ा उंच मनोरे उभारले जातात. शासनाच्या वतीने त्यांची उभारणी होते. परंतु नंदुरबार जिल्ह्याच्या विचार करता शासन, प्रशासनातर्फे अवघ्या चार ठिकाणीच ते उभे करण्यात आले आहेत. त्यांची संख्या आणखी वाढविण्याची सद्य:स्थितीतील गरज आहे. गेल्या दोन ते तीन वर्षातील घटना लक्षात घेता वीज पडून मृत्यू होणा:यांची संख्या अधिक आहे.येथे आहेत अटकाव मनोरे..जिल्ह्यात अवघ्या चार ठिकाणी वीज अटकाव मनोरे उभारण्यात आलेले आहेत. त्यात नंदुरबार शहर, बालआमराई, ता.नवापूर, कळंबू, ता.शहादा व तळोदा शहर या ठिकाणांचा समावेश आहे. शासनाने सर्वेक्षण करून सात ठिकाणांची निवड केली होती. त्यापैकी केवळ दोन ठिकाणी मनोरे बसविण्यात आले आहेत. त्यापूर्वी दोन ठिकाणी होतेच. उर्वरित पाच ठिकाणीदेखील तातडीने मनो:यांची उभारणी करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.अनेकांचा मृत्यूजिल्ह्यात गेल्या काही वर्षातील वीज पडून मृत पावलेल्यांची आकडेवारी पाहिली तर दरवर्षी त्यात वाढच होत असल्याचे दिसून येत आहे.  2014 मध्ये सात जणांचा वीज पडून मृत्यू झाला होता. 2015 मध्ये पाच जणांचा मृत्यू झाला होता. 2016 मध्ये सहा तर गेल्या वर्षी देखील पाच जणांचा मृत्यू झाला होता. याशिवाय पाळीव प्राण्यांची संख्या आणखी वेगळी आहे. एक लाख सानुग्रह अनुदानवीज पडून होणा:या मृत्यूस  नैसर्गिक मृत्यू म्हटले जाते. त्यासाठी तलाठीचा पंचनामा, पोलिसात करण्यात आलेली नोंद या आधारावर मृतकाच्या वारसास एक लाख रुपये मदत दिली जाते. याशिवाय पाळीव पशूंचा मृत्यू झाल्यास त्यालाही नुकसान भरपाई दिली जाते.विविध कारणेवीज पडण्याचे प्रमाण का वाढले याबाबत विविध मतप्रवाह आहेत. पूर्वी पावसाळ्याच्या सुरुवातीला होणारे वादळवा:याच्या वेळी वीज पडण्याचे प्रमाण अधिक राहत असे. आता तर संपूर्ण पावसाळा तसेच बेमोसमी पावसाच्या वेळीदेखील वीज पडत आहे. पर्यावरणवादी तसेच इतर अभ्यासकांचे याबाबत वेगवेगळे मतप्रवाह आहेत. जागतिक तापमानवाढ, पर्यावरणाचा बिघडलेला समतोल, वृक्षांची कमी झालेली संख्या ही कारणे दिली जात आहेत. एकुणच वीज पडण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे.जिल्ह्यात ज्या चार ठिकाणी नैसर्गिक वीज अटकाव मनोरे आहेत त्या मनो:यांची वीज अटकाव करण्याची रेंज ही केवळ पाच ते सात किलोमीटर परिघाच्या आतच आहे. याशिवाय कारखाने, पवन ऊर्जा कंपनीचे टॉवर, मोठय़ा शासकीय व खासगी इमारती यांच्यासह मोबाइल टॉवरवरदेखील वीज अटकाव करण्यासाठी तशी यंत्रणा उभारली जाते. तसा शासनाचा नियमच आहे. ठरावीक उंचीची इमारत, टॉवर उभारल्यास वीज अटकाव यंत्रणा तेथे बसवावीच लागते. परंतु त्यांची क्षमता ही तेवढय़ा एरियापुरतीच मर्यादित राहते. त्यामुळे त्यांचा फारसा उपयोग इतर ठिकाणच्या नैसर्गिक आपत्तीपासून बचावासाठी होऊ शकत नाही. त्यामुळे शासनातर्फे उभारण्यात येणा:या मनो:यांचाच सर्वाधिक उपयोग होत असतो.जिल्ह्यात सर्वाधिक वीज पडण्याचे प्रमाण पाहता सर्वेक्षण करून सात ठिकाणी मनोरे बसविण्याचे प्रस्तावित करण्यात आले होते. त्यात नंदुरबार तालुक्यातील पूव्रेकडील भाग, अक्कलकुवा, तळोदा, धडगाव, नवापूर शहर व शहादा शहर या ठिकाणांचा समावेश होता.