शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

बंधारफळी येथे वीज उपकेंद्राचा भुमिपूजन कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 12:37 PM

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : बंधारफळी ता़ नवापूर येथे उभारण्यात येणारे वीज उपकेंद्र कार्यान्वित झाल्यानंतर शहरासह संपूर्ण तालुक्यातील नागरिकांना निर्माण होणा:या वीजेच्या समस्येपासून सुटका होईल असा विश्वास खासदार डॉ. हीना गावीत यांनी सोमवारी येथे व्यक्त केला.एकात्मिक उर्जा विकास योजनेअंतर्गत बंधारफळी येथे वीज उपकेंद्राचे भुमिपूजन खासदार डॉ़ हीना गावीत यांच्या हस्ते करण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : बंधारफळी ता़ नवापूर येथे उभारण्यात येणारे वीज उपकेंद्र कार्यान्वित झाल्यानंतर शहरासह संपूर्ण तालुक्यातील नागरिकांना निर्माण होणा:या वीजेच्या समस्येपासून सुटका होईल असा विश्वास खासदार डॉ. हीना गावीत यांनी सोमवारी येथे व्यक्त केला.एकात्मिक उर्जा विकास योजनेअंतर्गत बंधारफळी येथे वीज उपकेंद्राचे भुमिपूजन खासदार डॉ़ हीना गावीत यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार डॉ़ विजयकुमार गावीत होते. यासोबत भाजपाचे जिल्हा सरचिटणीस एजाज शेख, कुश गावीत, सविता जयस्वाल, बंधारफळी गावाचे सरपंच रामु गावीत, प्रदीप वळवी, घनश्याम परमार, जाकिर पठाण आदी उपस्थित होते.महावितरणच्या उपविभागातील ग्रामीण भागात अद्यापही वीज समस्या कायम आहे. अनेकदा वीजपुरवठा खंडित होतो. त्यामुळे नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो. नवापूर तालुक्यातील बंधारफळी येथे वीज उपकेंद्रची मागणी करण्यात आली होती. कमी दाबाच्या वीज पुरवठय़ामुळे या भागातील नागरिक त्रस्त झाले आहेत. समस्या दुर व्हावी यासाठी अनेक वेळा मोर्चे काढण्यात आल़े निवेदन देण्यात आली होती. त्याअनुशंगाने उपकेंद्र मंजूरही करण्यात आले होत़े परंतु यासाठी जमीन उपलब्ध होत नसल्याने थोडा विलंब झाल्याची माहिती देण्यात आली.नवापूर तालुक्यातील आदिवासी पाडय़ातील भागात मागणीपेक्षा अत्यल्प वीजपुरवठा केला जात आहे. त्यामुळे सातत्त्याने वीजपुरवठा खंडित होण्याच्या प्रकारातही वाढ झाली आह़े सर्वसामान्य जनता, शेतकरी, मजूर, कामगार, व्यापारी, विद्यार्थी व कर्मचारी सर्वानाच विजेच्या लपंडावाचा फटका बसत होता.कमी दाबाच्या वीजपुरवठय़ामुळे घरगुती उपकरणेही नीट काम करीत नव्हती. अनेकदा उपकरणे निकामीही झाली असल्याच्या व्यथा उपस्थित ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात आल्या़ या समस्या सोडवण्यासाठी बंधारफळी गावाच्या शिवारात विद्युत उपकेंद्र निर्माण करण्यात येत असल्याचे डॉ. हिना गावीत यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वीज वितरण कंपनीचे अभियंता चव्हाण यांनी केले.