लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : पाणीपुरवठासाठी लागणा:या वीजेच्या बिलाची रक्कम न भरणा:या सारंगखेडा, प्रकाशा, लोणखेडा या मोठय़ा गावांसह शहादा उपविभागातील 82 गावांचा वीजपुरवठा खंडित केल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे पाणीपुरवठाचे वेळापत्रक कोलमडणार असून ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे.शहादा उपविभाग भाग एकमध्ये 141 ग्रामपंचायती ग्राहक आहेत. त्यापैकी 82 ग्रामपंचायतींवर 10 कोटी 65 लाख रुपये थकीत झाल्याने ही कारवाई करण्यात आली. तसेच याच उपविभाग अंतर्गत 107 गावांपैकी 41 गावांचे पथदिव्यांचा वीज पुरवठा देखील खंडित करण्यात आली आहे. या 107 गावांचे 14 कोटी 75 लाख थकीत झाल्याने ही कारवाई करण्यात आली. यामुळे गावागावात अंधाराचे साम्राज्य राहणार आहे. या अंधाराचा भुरटे चोर फायदा घेत असल्याने चो:यांचे प्रमाण वाढले आहे. त्यात भर म्हणजे स्ट्रीट लाईट बंद राहिल्याने चो:यांच्या प्रकारात वाढ होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे संबंधित वरिष्ठांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.82 गावातील पाणीपुरवठा करण्यासाठी लागणारा वीजपुरवठा खंडित झाल्याने या गावांमधील ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे. जोर्पयत वीज बिलाचा भरणा होत नाही तो र्पयत ग्रामस्थांना पाणी मिळणार नाही.मार्च 2017 ते फेब्रुवारी 2018 र्पयतचे सर्व थकबाकी भरल्याशिवाय वीज जोडणी होणार नाही असा पवित्रा वीज वितरण कंपनीने घेतल्यामुळे गावा-गावात पाण्यासाठी ग्रामस्थांचे हाल होणार आहे.
शहादा उपविभागातील 82 गावांचा वीजपुरवठा खंडित केल्याने खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 12:23 PM