प्रकल्प स्तरीय पोषण माह कार्यक्रम जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण सभापती निर्मलाताई सीताराम राऊत यांच्या अध्यक्षतेखाली झाला. कार्यक्रमात कुपोषण रोखण्यासाठी करावयाची उपाययोजना, स्थलांतर व कुपोषणसंबंधी सात अन्नघटक याबाबत अंगणवाडी सुपरवायझर वंदना पाटील व सारिका दादर यांनी मार्गदर्शन केले. तसेच सीएफपी कर्मचारी यांनी समृद्धी बजेट, स्थलांतर रोखण्याची गरज, रोजगार हमी योजनेची कामे याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी पोषण प्रतिज्ञा घेण्यात आली. कार्यक्रमास सीताराम राऊत यांनी आपल्या बोली भाषेत मार्गदर्शन करत ग्रामस्थांना स्थलांतर न करण्याचे आवाहन केले व गावातच रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करू, असे आश्वासन दिले. यावेळी सरपंच, ग्रा. पं. सदस्य, पोलीस पाटील, वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पिंपळखुटा पोषण मेळाव्यात जनजागृतीवर भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 4:33 AM