शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
2
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
3
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
4
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
5
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
6
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?
7
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
8
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
9
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई, सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ५ जण ठार
10
सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रीटा आंंचन यांचं दुःखद निधन, ७० च्या दशकातील बॉलिवूड सिनेमे गाजवले
11
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण
12
पर्थ टेस्टसाठी शास्त्रींनी निवडली बेस्ट संभाव्य प्लेइंग इलेव्हन; सर्फराजपेक्षा KL राहुल भारी?
13
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
14
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्तव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!
15
भामरागडमध्ये पर्लकोटा नदीजवळ स्फोट, पोलिसांकडून सर्च ऑपरेशन
16
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
17
'अबीर गुलाल'नंतर नुकतीच सुरु झालेली कलर्स मराठीवरील नवी मालिका होणार बंद? चाहत्यांना धक्का
18
Meta चा Video, लोकेशनसह अलर्ट; पोलिसांनी १२ मिनिटांत ९ किमी जाऊन वाचवला तरुणाचा जीव
19
Sunita Williams : सुनीता विल्यम्सच्या अडचणी वाढल्या, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात तडे, अनेक ठिकाणाहून गळती
20
जेफरीजनं 'या' ५ Stock वर सुरू केलं कव्हरेज, दिला खरेदीचा सल्ला; HAL, PNB सारख्या दिग्गजांचा समावेश

कर्मचा:यांच्या अनुपस्थितीमुळे जि़ प़ अध्यक्षांचा संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 2:55 PM

उमराण प्रा़ आ़ केंद्र : विद्यार्थिनीला चक्कर येऊनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही

नवापूर : तालुक्यातील उमराण प्राथमिक आरोग्य केंद्रात शुक्रवारी जिल्हा परिषद अध्यक्षा रजनी नाईक यांनी भेट दिली असता वैद्यकीय अधिकारी तसेच इतर कर्मचारी  अनुपस्थित असल्याचे आढळून आल्याने त्यांनी संताप व्यक्त केला. उमराण येथील ग्रामविकास संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल व माध्यमिक विद्यालयात  मानविकास योजनेअंतर्गत  रजनी नाईक यांचा हस्ते तसेच उमराणच्या सरपंच शैलाबाई वसावे, उपसरपंच गोरजी गावीत व उमराण येथील ग्रामविकास संस्थेचे सचिव दिपक वसावे यांच्या उपस्थितीत मुलींना सायकल वाटप करण्यात आले. कार्यक्रमात अचानक मोनिका गावीत रा. चेडापाडा या विद्यार्थिनीला फिट आले. तिला उमराण प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यासाठी रुग्णवाहीकेस बोलविण्यात आले. मात्र 108 रुग्णवाहीकेचा चालक उपस्थित नसल्याने स्वत:च जिल्हा परिषद अध्यक्षा रजनी नाईक यांनी शिक्षकांच्या मदतीने आपल्या वाहनातून मोनिकाला  उमराण प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. प्राथमिक आरोग्य केंद्रात केवळ परिचारिका उपस्थित होत्या. वैद्यकीय अधिकारी व रुग्णवाहिका चालक अनुपस्थित असल्याचे आढळून आले.  पारिचारिकांनी विद्यार्थिनीला सलाईन लावत औषधोपचार केले. त्या रुग्ण विद्यार्थिनीची तपासणीसाठी एकही वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्याने रजनी नाईक यांनी संताप व्यक्त       केला. अनेक वेळा प्राथमिक आरोग्य केंद्रात अशी स्थिती निर्माण होत असल्याने यातून रुग्णांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याच्या संतप्त  भावना सर्वसामान्यांकडून व्यक्त करण्यात येत आह़े रजनी नाईक यांनी उपस्थित कर्मचा:यांची चांगलीच कानउघाडणी करुन पुन्हा असे प्रकार घडता कामा नयेत अशी तंबीही           दिली़24 विद्यार्थिनींना सायकल वाटप न्यु इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय उमराण येथील 15 मुलींना व अंजने येथील 9 मुलींना सायकल वाटप करण्यात आले. या वेळी रजनी नाईक म्हणाल्या की,  मानव विकास योजनेअंतर्गत या मुलींना पाच कि. मी. अंतरावरून ये-जा करणे सुलभ होणार आहे. विद्याथीर्नींनी चांगले शिक्षण घेऊन आपल्या पायावर उभे राहावे. वयात आल्यावर लग्न करा. कमी वयात लग्न केल्यामुळे कुपोषणाचा धोका असतो. सर्वानी किमान एक वृक्ष आपल्या घरासमोर लावुन त्याचे संवर्धन केले पाहीजे. व्यसनापासून दुर रहा व आपला परीसर नेहमी स्वच्छ ठेवा. शौचालयाचा वापर नेहमी करा व पावसाळ्यात पाणी उकळून आदी मार्गदर्शन करण्यात आल़े नंदुरबार जिल्हा परिषदेने जिल्हा तंबाखुमुक्त करण्याचा संकल्प केला आह़े त्यासाठी सर्वानी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ए. एम. पाटील यांनी केले तर आभार शरद पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी परीश्रम घेतले