शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
4
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
5
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
6
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
7
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
8
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
9
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
10
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
11
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
12
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
13
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
14
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
15
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
16
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
17
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
18
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
19
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
20
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य

लाभार्थीचा बीडीओंना घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2017 11:36 AM

पंतप्रधान आवास योजना : कन्साई गावातील फक्त तीनच जणांची निवड झाल्याने नाराजी वंचित

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थी निवडीत फक्त तीनच जणांची निवड झाली व सुमारे 400 कुटुंब त्यापासून वंचित आहेत. सरपंच व ग्रामसेवकांच्या हेकेखोरपणामुळे लाभार्थी योजनेपासून वंचित राहिले असल्याचा आरोप करून वंचित लाभार्थीनी मंगळवारी पंचायत समितीच्या गटविकास अधिका:यांना घेराव घातला.पंतप्रधान आवास योजनेच्या लाभासाठी शहादा तालुक्यातील कन्साई ग्रुपग्रामपंचायतीअंतर्गत येणा:या 10 गावांचा 2011 च्या जनगणनेनुसार सव्रे करण्यात आला होता. यापैकी ग्रामपंचायतीचे मूळगाव कन्साई सोडले तर लिंबर्डी, जुनी लिंबर्डी, केवडापाणी, लहान भेंगापाणी, निंबर्डी, नवागाव या गावात सुमारे 400 घरकूल मंजूर झाले आहेत. मात्र कन्साई गावातील सुमारे 400 कुटुंब या योजनेपासून वंचित आहेत. याबाबत लाभार्थीनी सरपंच व ग्रामसेवक यांच्याकडे लेखी व तोंडी तक्रारी केल्या मात्र त्यांच्या तक्रारीकडे हेतूत: दुर्लक्ष केले. 15 ऑगस्ट 2016 रोजी झालेल्या ग्रामसभेत याबाबत ग्रामसेवकाने उडवाउडवीची उत्तरे दिली होती. या ग्रा.पं.अंतर्गत येणा:या इतर गावांमधील लाभार्थीना घरकूल मंजूर झाले. मात्र कन्साई गावातील अनेक लाभार्थी या योजनेपासून वंचित राहिल्याने त्यांच्यात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. कन्साई ग्रा.पं.चे सरपंच व ग्रामसेवक यांना लाभार्थीनी घरकूल योजनेच्या लाभाबाबत वारंवार कळवूनही त्यांनी दुर्लक्ष केल्याने अनिल ठाकरे, अनिल वळवी, जगदीश पवार, केशव ठाकरे, करण वळवी, विष्णू मोरे, पंकज पाडवी, महेंद्र पवार, दीपक पवार, रवींद्र मोरे, संजय कोतवाल, किसन मंदील, कृष्णा मोरे, मंगल ठाकरे, राजेश सोनवणे, सुनील ठाकरे, व सुनील पवार यांनी मंगळवारी गटविकास अधिकारी श्रीराम कागणे यांना घेराव घातला. या वेळी वंचित लाभार्थी व ग्रामस्थांनी घरकूल योजनेचा लाभ मिळत नसल्याची कैफियत मांडून चर्चा केली. ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून वंचित लाभार्थीना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन गटविकास अधिकारी कागणे यांनी दिले