लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शहादा-डोंगरगाव रस्त्यावर दोन्ही बाजूस अतिक्रमण व प्रवासी वाहतुकीच्या वाहनांची गर्दी होऊ लागल्याने हा रस्ता अपघाताला आमंत्रण देणारा ठरण्याची शक्यता आहे.बसस्थानक व न्यायालयांना लागून असलेला डोंगरगाव रोड पुन्हा अतिक्रमणाच्या विळख्यात अडकत असून, रस्त्यावरील अतिक्रमण पुन्हा जैसे थे होऊ लागले आहे. या रस्त्यावर प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांचेही अतिक्रमण होऊ लागल्याने हा रस्ता अपघाताला कारणीभूत ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या वर्षी नगर पालिकेने डोंगरगाव रोडवरील सर्व अतिक्रमण काढून रस्ता मोकळा केला होता. मात्र रस्ता मोकळा केल्यानंतर पालिकेने येथे पुन्हा अतिक्रमण होऊ नये म्हणून कोणतीच उपाययोजना न केल्याने व्यावसायिकांनी हळूहळू पुन्हा येथे टपºया ठेऊन अतिक्रमण केले आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ असणारे अतिक्रमण पटेल रेसीडेन्सी चौकापर्यंत पसरले आहे. टपऱ्यांच्या अतिक्रमणासोबतच अवैध प्रवासी वाहतूक करणारी असंख्य वाहने रस्त्यावर उभी राहात असल्याने दुहेरी वाहतूक असणाºया या रस्त्यावर नेहमी वातुकीची कोंडी होते.तोरणमाळ, धडगांव, बोरद, मंदाणे, साखर कारखाना, सूतगिरणी, मध्यप्रदेश या भागाकडे जाणारी सर्व वाहने, एस.टी. बस ही याच मार्गाने जात असल्याने या रस्त्यावर मोठी रहदारी असते. या मार्गावर अनेक दवाखाने, शाळा, कॉलेज व न्यायालय असल्याने नागरिकांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे हा रस्ता रहदारीसाठी मोकळा असणे आवश्यक असतांना या रस्त्यावरील व्यावसायिक व प्रवासी वाहतुकदारांच्या अतिक्रमणाकडे नगर पालिका प्रशासन व पोलीस विभाग दुर्लक्ष करित असल्याने हा रस्ता अपघातास कारणीभूत ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शहादा-डोंगरगाव रस्त्यावर अतिक्रमणाचा विळखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2019 12:09 PM