लोकमत न्यूज नेटवर्कधडगाव : देवबारा ता़ धडगाव येथे दोन दिवसीय वाग्देव यात्रोत्सव मोठय़ा उत्साहात पार पडला़ पाच आणि सहा फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या या यात्रोत्सवात गुजरात, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रातील आदिवासी बांधव सहभागी झाले होत़े निसर्गाचा एक भाग असलेल्या वनांमध्ये निवास करणा:या वाघाने गाव शिवारातील पशु पक्षी, माणसे यांच्यावर हल्ला करू नये, गाव-पाडय़ात समृद्धी नांदावी यासाठी माघ महिन्यात महाशिवारात्रीपूर्वी वाग्देवता पूजन केले जात़े येथे पूजन झाल्यानंतर आदिवासी बांधव याहा मोगी देवीच्या दर्शनासाठी देवमोगरा (गुजरात) येथे रवाना होतात़ वाग्देवाला आदिवासी महिलांकडून बांबूच्या टोपलीत आणलेले धन, धान्य आणि महू यांचा नैवेद्य दाखवला जातो़ हा नैवेद्य दाखवल्यानंतर पूजन करून ठिकठिकाणी यात्रोत्सवांना प्रारंभ करण्याची परंपरा शेकडो वर्षापासून सुरू आह़े धडगाव-शहादा रस्त्यावर धडगावपासून 12 किलोमीटर अंतरावर देवबारा हे गाव आह़े वाग्देवाचे स्थान म्हणून आदिवासी बांधवांमध्ये त्याची ओळख आह़े याठिकाणी महाशिवरात्रीपूर्वी यात्रोत्सवाची परंपरा आह़े सोमवारी सुरू झालेल्या या यात्रोत्सवात पारंपरिक वेशभूषेत महिला आणि पुरूषांनी लक्ष वेधून घेतल़े डोक्यावर पांढरे कापड बांधलेल्या बांबूच्या टोपल्या घेत महिला वाग्देवाची स्तुतीगिते गात होती़ याठिकाणी रात्री सोंगाडय़ा पार्टीचे आयोजन करण्यात आले होत़े यातही कलांतवंतांनी गीत आणि नाटय़रूपांतर करत वनातील वाघाचे महत्त्व आणि त्यांचे संवर्धन कसे झाले पाहिजे याबाबत प्रबोधन केल़े आदिवासी समुदायात देवरूप मानल्या गेलेल्या वाघाची दिनचर्याही त्यांनी सोंगाडय़ा पार्टीद्वारे सादर करत उपस्थितांची दाद मिळवली़ देवबारा येथील यात्रोत्सवानंतर सातपुडय़ाच्या कानाकोप:यातील यात्रोत्सवांना सुरूवात होत़े गावोगावी वाग्देव पूजनाचे कार्यक्रमही घेण्यात येतात़ महाशिवरात्रीपासून दुर्गम भागातील तोरणमाळ आणि देवमोगरा येथे यात्रोत्सव असल्याने आदिवासी बांधवांमध्ये चैतन्य संचारल्याचे सध्या दिसून येत आह़े
सातपुडय़ात वाग्देव यात्रोत्सवाचा उत्साह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 12:28 PM