नंदुरबार : जिल्ह्यातील इतर तालुक्यांप्रमाणेच धडगाव व अक्कलकुवा तालुक्यात देखील दुष्काळी परिस्थिती आहे. कागदोपत्री सरासरीच्या तुलनेत 80 ते 90 टक्के पाऊस झाल्याचे दिसत असले तरी तशी परिस्थिती नाही. त्यामुळे इतर तालुक्यांप्रमाणे या दोन तालुक्यांमध्येही दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी करीत तसा ठराव जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत करण्यात आला.अध्यक्षा रजनी नाईक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा गुरुवारी दुपारी घेण्यात आली. यंदाच्या पंचवार्षीकमधील विद्यमान पदाधिकारी व सदस्यांची ही शेवटची सभा असल्याची शक्यता आहे. सभेत उपाध्यक्ष सुहास नाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, सभापती आत्माराम बागले, दत्तू चौरे, हिराबाई पाडवी, लताबाई पाडवी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनिष सांगळे यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. बैठकीत दुष्काळी आढावा घेवून उपाययोजना करण्यासाठी तातडीने पाउले उचलण्याची मागणी सदस्यांनी केली. शासनाने पावसाच्या सरासरी आकडेवारीनुसार जिल्ह्यातील चार तालुके दुष्काळी घोषीत केले. अक्कलकुवा व धडगाव तालुके त्यातून वगळण्यात आले आहेत. या दोन्ही तालुक्यांमध्ये सरासीरच्या तुलनेत ब:यापैकी पजर्न्यमान झाले असले तरी पडलेले पावसाचे पाणी वाहून गेले आहे. डोंगर-उतार व इतर ठिकाणी पाणी साठविण्याची उपाययोजना नसल्यामुळे पावसाचे पाणी वाहून जाते. त्यामुळे पाऊस येऊनही धडगाव, अक्कलकुवा तालुक्यात पिकांची स्थिती जैसे थे आहे. ही बाब लक्षात घेता धडगाव व अक्कलकुवा तालुक्यांमध्येही दुष्काळ जाहीर करण्यासाठी जिल्हा परिषदेने ठराव करून तो शासनाकडे पाठवावा अशी मागणी अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील सदस्यांनी केली.शासकीय इमारतींचे निर्लेखनशासकीय इमारती अर्थात शाळा, दवाखाने, पशुवैद्यकीय दवाखाने व इतर इमारती यांचे निर्लेखन करण्यासाठी संबधितांना प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन करण्यात आले होते. परंतु कुठल्याही तालुक्याने प्रतिसाद दिला नाही. शिक्षण विभागाअंर्गत सर्वाधिक प्राथमिक शाळा इमारतींची दुरवस्था झाली आहे. त्यांची दुरूस्ती तात्काळ करण्याची मागणी यावेळी सुहास नाईक रामचंद्र पाटील, रतन पाडवी, सागर तांबोळी यांच्यासह सदस्यांनी केला.कहाटूळची पाणी योजनाकहाटूळची पाणी योजना तापी नदीतूनच करण्याची मागणी रामचंद्र पाटील यांनी केली. गावातील वितरण व्यवस्थेची पाईपलाईन तशीच ठेवण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला.गटशिक्षणाधिका:यांविरुद्ध तक्रारधडगावचे गटशिक्षणाधिकारी यांच्याविषयी अनेक तक्रारी आहेत. धडगाव तालुक्यातील शिक्षणाचा खेळखंडोबा याच अधिका:यांमुळे होत आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करून त्यांना कार्यमुक्त करण्याची मागणी उपाध्यक्ष सुहास नाईक यांनी केली. पदवीधर शिक्षकांच्या जागेवर उपशिक्षकांना नियुक्ती दिली गेली आहे. संबधीताची चौकशी करून कारवाईचे आश्वासन यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिली.
यावेळी इतरही विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. जिल्हा परिषद दाधिकार व सदस्यांचही ही शेवटची सभा असण्याची शक्यता लक्षात घेता सभेत अनेक विषयांवर चर्चा होऊन निर्णय घेतले जातील अशी अपेक्षा होती.