या चर्चासत्रात प्रमुख मार्गदर्शक म्हणून राज्य समन्वयक, महिला उद्योजकता कक्ष, एम.सी.ई.डी. औरंगाबाद येथील भारती सोसे उपस्थित होत्या. अध्यक्षस्थानी महाविद्यालय विकास समिती सदस्या प्रीती पाटील होत्या. चर्चासत्राचे आयोजन अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. कैलास चव्हाण, शशिकांत कुंभार यांनी केले.
चर्चासत्रात उपस्थित मान्यवर व विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना भारती सोसे म्हणाल्या की, महिलांमध्ये उद्योजक असणे हा उपजत गुण असतो. परिश्रम, नावीन्यपूर्ण कार्य, स्मार्टवर्क, मॅनेजमेंट कौशल्य, जिद्द, संवादकौशल्य असे कितीतरी उद्योगाला पूरक असे व्यवस्थापन कौशल्ये महिलांमध्ये असतात. म्हणून महिलांनी एक आदर्श गृहिणीसोबत यशस्वी महिला उद्योजक बनणे काळाची गरज आहे. अध्यक्षीय मनोगतात प्रीती पाटील म्हणाल्या, महिलांनी पुरुषांच्या बरोबरीने उद्योगक्षेत्रात पाऊल टाकले पाहिजे. पाटील ह्या स्वतः उद्योगक्षेत्रात असून, त्यांनी महिला उद्योग यासंदर्भात विविध उदाहरणे दिलीत. चर्चासत्राच्या शेवटी शशिकांत कुंभार यांनी ही विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना भारतातील यशस्वी महिला उद्योजकांच्या कर्तृत्वाला उजाळा दिला तसेच सहभागी महिला व विद्यार्थ्यांना यशस्वी उद्योजक होण्यासाठी प्रोत्साहित केले. सूत्रसंचालन रेणुका पाटील यांनी मानले.
चर्चासत्रासाठी प्रा. काकासाहेब अनपट, प्रा. संतोष तमखाने, प्रा. मंगला पाटील, प्रा. योगेश भुसारे, प्रा.देवचंद पाडवी, प्रा.खेमराज पाटील, प्रा.रवींद्र खेडकर व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.