ऑनलाईन लोकमतदिनांक 17 ऑगस्टनंदुरबार : जिल्ह्यात 64 टक्के पाऊस होऊनही लघु व मध्यम प्रकल्पांमध्ये निम्मेही पाणीसाठा होऊ शकला नसल्याची स्थिती आहे. दुसरीकडे प्रकाशा व सारंगखेडा बॅरेज प्रकल्पातील पाणी सोडून देण्यात आल्यानंतर दोन दिवसांपासून पुन्हा पाणी अडविण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, नवापूर व शहादा तालुक्यात पावसाने अद्यापही पन्नाशी गाठली नसल्याची स्थिती आहे. जिल्ह्यात यंदा पावसाचे उशीराने आगमन झाले. परिणामी जूनची सरासरी पुर्ण होऊ शकली नव्हती. जुलैमध्ये ब:यापैकी पाऊस झाला. ऑगस्टचा पहिला आठवडाही मध्यम स्वरूपाचा पावसाचा होता. त्यामुळे जिल्ह्यात पावसाची सरासरी 64 टक्केर्प्यत गेली असली तरी अद्यापही अनेक भागात दमदार पावसाची अपेक्षा कायम आहे. आतार्पयत सर्वाधिक पाऊस हा धडगाव व तळोदा तालुक्यात नोंदविण्यात आला आहे. तर सर्वात कमी पाऊस शहादा तालुक्यात सरासरी 49 तर नवापूर तालुक्यात 50 टक्के झालेला आहे. पावसाच्या अनियमितपणामुळे जिल्ह्यातील लघु व मध्यम प्रकल्पांमधील पाणीसाठा अद्यापही समाधानकारक झालेला नाही. 37 लघु व चार मध्यम प्रकल्प मिळून केवळ 30.88 टक्के पाणीसाठा झालेला आहे. त्यामुळे प्रकल्पांना अद्यापही पाण्याची प्रतिक्षा कायम आहे.लघु प्रकल्प कोरडेजिल्ह्यातील 37 पैकी 10 लघु प्रकल्प अद्यापही कोरडेच आहेत. या प्रकल्पांमध्ये दहा टक्केच्या आतच पाणीसाठा आहे. 20 प्रकल्पांमध्ये 50 ते 60 टक्के व सात प्रकल्पांमध्ये त्यापेक्षा अधीक पाणीसाठा झालेला आहे. शहादा व नवापूर तालुक्यातील प्रकल्प सर्वाधिक कोरडे आहेत. तळोदा, धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील प्रकल्पांमध्ये ब:यापैकी पाणीसाठा झालेला आहे. मध्यम प्रकल्पजिल्ह्यात चार मध्यम प्रकल्पांपैकी केवळ दरा व रंगावली प्रकल्पात 100 टक्के पाणीसाठा झालेला आहे. तर शिवण प्रकल्पात केवळ 39 टक्के पाणीसाठा आहे. राणीपूर प्रकल्पात 61 टक्के पाणीसाठा झालेला आहे. तापीवरील प्रकाशा व सारंगखेडा बॅरेजचे दरवाजे गेल्या आठवडय़ात उघडण्यात आले होते. त्यामुळे या दोन्ही प्रकल्पात पाणीसाठा नव्हता. आता नदी प्रवाही असली तरी पाणीसाठा करावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत होती. त्याची दखल घेत पाटबंधावे विभागाने गेल्या दोन दिवसांपासून दोन्ही बॅरेजचे गेट बंद केले आहे. त्यामुळे दोन्ही ठिकाणी प्रत्येकी पाच ते सात टक्के पाणीसाठा झालेला आहे.जिल्ह्यात अद्यापही दमदार पावसाची प्रतिक्षा कायम आहे. सरासरीच्या तुलनेत जिल्ह्यात 63 टक्के पाऊस झाल्याची आकडेवारी असली तरी नदी, नाले प्रवाही होऊन त्याद्वारे प्रकल्प भरले गेले नसल्याची स्थिती आहे. जुलैच्या शेवटच्या आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ात झालेला पाऊस हा भिज पाऊस होता. त्यामुळे पिकांसाठी त्याचा उपयोग झाला असला तरी जमिनीतील पाणी पातळी वाढविण्यात किंवा प्रकल्पातील पाणीसाठा वाढण्यात त्याचा फारसा उपयोग झालेला नाही.जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस धडगाव तालुक्यात सरासरीचा 78.28, तळोदा तालुक्यात 76.74, अक्कलकुवा तालुक्यात 70.20, नंदुरबार तालुक्यात 62.50, नवापूर तालुक्यात 49.26 तर शहादा तालुक्यात 50.28 टक्के पाऊस झाला आहे.येत्या दीड महिन्यात आणखी पाऊस होण्याची शक्यता लक्षात घेता पावसाची सरासरी टक्केवारी 80 टक्केर्पयत जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अन्यथा दोन वर्षाप्रमाणेच टंचाईची तीव्रता कायम राहण्याची शक्यता आहे.
64 टक्के पाऊस होऊनही प्रकल्प कोरडेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 12:27 PM
लघु व मध्यम प्रकल्प : केवळ 31 टक्के पाणीसाठा, दोन प्रकल्प मात्र ओव्हरफ्लो
ठळक मुद्दे विरचक प्रकल्पालाही पाण्याची प्रतिक्षा.. नंदुरबारला पाणी पुरवठा करणा:या शिवण नदीवरील विरचक प्रकल्पात अद्यापही पाणीसाठा झालेला नाही. जून महिन्यात या प्रकल्पात 41 टक्के पाणीसाठा होता. आजच्या स्थितीत केवळ 39.48 टक्के पाणीसाठा आहे. पावसाचे प्रमाण असेच कायम