माघारीसाठी घडामोडींना वेग : नंदुरबार पालिका निवडणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 12:16 PM
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : माघारीसाठी अधिकृत उमेदवारांकडून विविध युक्त्या वापरल्या जात आहेत. त्याचा काहीही परिणाम सध्यातरी दिसून येत नाही. माघारीच्या शेवटच्या दोन दिवसातच घडामोडींना अधीक वेग येणार आहे. नंदुरबार पालिकेच्या 19 प्रभागातील 39 जागांसाठी तब्बल 213 इच्छूकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. पैकी छाननीत 104 अर्ज बाद झाल्याने आता ...
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : माघारीसाठी अधिकृत उमेदवारांकडून विविध युक्त्या वापरल्या जात आहेत. त्याचा काहीही परिणाम सध्यातरी दिसून येत नाही. माघारीच्या शेवटच्या दोन दिवसातच घडामोडींना अधीक वेग येणार आहे.नंदुरबार पालिकेच्या 19 प्रभागातील 39 जागांसाठी तब्बल 213 इच्छूकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. पैकी छाननीत 104 अर्ज बाद झाल्याने आता 109 उमेदवार रिंगणात आहेत. काही प्रभागात मोजकेच तर काहींमध्ये मोठय़ा प्रमाणावर इच्छूकांनी गर्दी केली आहे. मुख्य राजकीय पक्षांच्या अधिकृत उमेदवारांसमोर यामुळे मोठा पेच निर्माण झाला आहे. इतर उमेदवारांनी माघार घ्यावी यासाठी गेल्या दोन दिवसांपासून दबाव वाढविण्यात येत आहे. त्यासाठी विविध युक्तींचा वापर केला जात आहे. कुठे नातेसंबधाचा, कुठे व्यावसायिक संबधांचा, काही ठिकाणी न्यायालयात दाखल खटल्यांचा तर काही ठिकाणी सरळ अन्य मार्गाने दबावही टाकला जात आहे. हीबाब लक्षात घेता माघारीसाठी अधिकृत उमेदवारांची मोठी कसरत होत आहे.नंदुरबारातील उमेदवारांची संख्या लक्षात घेता माघारीसाठीच्या घडामोडींना वेग आलेला आहे. शेवटच्या दोन दिवसात अर्थात 22 ते 25 या दरम्यान माघारीसाठीचे अर्ज दाखल होणार आहेत. दिग्गजांची भाऊगर्दीएका प्रभागात मोठी चुरस आहेत. तेथे तीन दिग्गजांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे या प्रभागातील निवडणुक रंगणार आहे. ही बाब लक्षात घेता कमीत कमी मतविभाजन व्हावे यासाठी इतर अपक्षांनी माघार घ्यावी यासाठी प्रय} केले जात आहे. त्यासाठी आर्थिक अमिष, नोकरीचे अमिष दाखविले जात आहे. त्यामुळे या प्रभागातील माघार घेणा:या उमेदवारांकडे आता सर्वाचे लक्ष लागून आहे.व्यावसायिक संबधअशीच स्थिती आणखी एका प्रभागातील आहे. या प्रभागात काही उमेदवार व्यावसायिक आहेत. त्यांचे व्यावसायिक संबध एकमेकांमध्ये गुंतलेले आहेत. असे असतांना त्यांनी प्रतिस्पर्धी म्हणून अर्ज दाखल केले आहेत. परिणामी त्या प्रभागात कोण माघार घेतो, व्यावसायिक संबध जोपासले जातात काय, त्यासाठी काय काय उपाय केले जातात याकडे आता लक्ष लागून आहे.नातेगोते देखील अडचणीचेतीन प्रभागात एकाच समाजातील आणि एकाच नात्यातील उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. त्यामुळे या ठिकाणी मोठी चुरस रंगणार आहे. माघारीर्पयत यातील कोण माघार घेतो किंवा एकमेकांसमोर सरळ लढत देतात याकडे सर्वाच्या नजरा लागून आहेत. यंदाच्या निवडणुकीत समाज या फॅक्टरला मोठय़ा प्रमाणावर महत्त्व देण्यात आले आहे.