शहरातील बालवीर चौक परिसरात हा कार्यक्रम पार पडला. प्रारंभी गणपतीची आरती करण्यात आली. त्यानंतर माजी सैनिकांच्या हस्ते क्रांतीची मशाल प्रज्वलित करण्यात आली. यावेळी माजी सैनिक सुनील मुंडे, राजेश गिरणार, अशोक वाघ यांचा भारतमातेची प्रतिमा, तुळशी रोप भेट देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी विजय साळुंखे यांनी कोरोना काळात केलेल्या कामाबद्दल विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास वंजारी सेवा संघाचे उत्तर महाराष्ट्र विभागीय सहकार्याध्यक्ष देवीदास पेटकर, वंजारी समाज महिला आघाडीच्या सहसचिव सुरेखा देवीदास पेटकर, उपाध्यक्ष सरिता अनिल कागणे, सचिव विद्या राहुल गाभणे, संघटक सोनाली शैलेंद्र गवते, काणे प्राथमिक विद्यामंदिराच्या मुख्याध्यापिका सुलभा महिरे, कृषी अधिकारी अनिल कागणे, नायब तहसीलदार शैलेंद्र गवते, शिक्षक राहुल गाभणे उपस्थित होते. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष महादू हिरणवाळे यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम पार पडला. यशस्वीतेसाठी जी.एस. गवळी, गणेश उत्सव समितीचे अध्यक्ष अशोक यादबोले, उपाध्यक्ष संभाजी हिरणवाळे, सदस्य कैलास ढोले, प्रा. एकनाथ हिरणवाळे, साहुल कुशवाह, सिद्धेश नागापुरे, काशिनाथ गवळी, सदाशिव गवळी यांनी परिश्रम घेतले.
शिरीष कुमार मंडळातर्फे अनोख्या सन्मानाने माजी सैनिक भारावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 4:33 AM